Jump to content

पान:निवडक अंतर्नाद.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केलेली दुःसाहसं कमी का आहेत? याच मिसिरच्या ताडीबनात मध्यरात्री फिरणाऱ्या पिशाच्चांची आणि त्यांच्या इतर भुताखेतांची पर्वा न करता, अंधारात ताडीच्या झाडावर चढून, मडक्यात झिरपून गोळा झालेली ताडी त्यानं पिऊन टाकली होती. मिसिरच्या लहानग्या भाच्याच्या हातातलं पाच तोळे सोन्याचं कडं वेताळाच्या विहिरीत पडलं होतं, तेव्हा वेताळाची पर्वा न करता सुमेसर विहिरीत उतरला होता, आणि विहिरीच्या अंधाऱ्या तळात बुड्यांवर बुड्या मारून शेवटी तासाभराच्या प्रयत्नानंतर त्यानं ते कडं शोधून काढलं होतं. त्याचं बक्षीस जोगिंदर मिसिरने काय दिलं होतं, तर वीस रुपयांची एक नोट बस्स. आजूबाजूच्या बघ्यांनी मात्र त्याच्या साहसाची मुक्त कंठानं प्रशंसा केली होती. जुन्या कहाणीच्या रंगात बुडून जाण्याची ही वेळ नव्हती. या वेळी तर भीतीनं त्याच्या घशाला कोरड पडली होती आणि फाल्गुनी थंडीतही अंगाला दरदरून घाम फुटला होता. वाळक्या पापडांसारख्या शुष्क ओठांवरून जीभ फिरवून त्यानं आकाशाकडे एक नजर टाकली. पहाटेच्या फटफटण्यामुलं तिथं आता एक-दोन सोडल्या तर बाकी चांदण्या मंद होऊन गेल्या होत्या. पण सुमेसरच्या आजूबाजूला बांबूवनात मात्र अजून अंधार होता. आता मात्र इथून पळून जाणंच श्रेयस्कर शौचाबद्दल आता त्यानं डोक्यातून विचार काढून टाकला. अंगणाकडे त्यानं पुन्हा एक नजर टाकली. सगळं काही पूर्ववत होतं. एक खाट मात्र रिकामी दिसत होती. हे काय? हा ललनवा कुठं गेला? सगळ्या पहारेकऱ्यापैकी मजबूत शरीराचा, दगडी छातीचा, जल्लाद-धरमी ललनवा! याचा बाप तितकाच जल्लाद परभुवा! त्यानेच हरियाला पकडून कुत्र्यांच्या तोंडी दिलं होतं. चितेसाठी प्रेताचे तुकडेदेखील शिल्लक राहू दिले नव्हते. कुठे गेला असेल ललनवा? इकडे बांसवाड्यातच शौचासाठी येत नसेल ना? किंवा शौचासाठी नाहीतर नुसता पहारा देण्यासाठी, चोरा-चिलटांची खात्री करून घेण्यासाठी? आता सुमेसर निघून जाण्यासाठी उठला रे उठला की ललनवा त्याच्यावर झेप यकील किंवा समोरून नाही तर पाठीमागून त्याच्या टकुरावर काठीचा एक जोरदार वार करील. या पहारेकऱ्यांकडे तर दुनाळी बंदूक पण आहे ती काय नुसतं घाबरवण्यासाठीच? सुमेसर काळजीत पडला. निश्चल बसून चौकस नजरेनं इकडे तिकडे ललनवाचा शोध घेऊ लागला. पूर्वेकडे त्यांचीच घरं होती. त्यांना 'पूरवा का डेरा' असंच म्हणत तिथल्या झोपड्या आणि समोरची डुकरांची खोपी अजूनही मसणवट्यासारखी शांतच होती. एरवी खांय् खांय् खोकणारा बलेसर काकाचा गळा आज घरघरत नव्हता. रामायणबाबाचं भजनगायनही भल्या पहाटे सुरू व्हायचं तेही आज बंद होतं. गेल्या चार दिवसांच्या संकटानं सर्वांनाच असं त्रासून टाकलंय, की आता निद्रेच्या हवाली जाऊन सर्वांना थोडी शांती मिळाली असावी. असं संकट कुणावर येऊ नये. दोन वेळच्या जेवणाचं संकट, पोरी बाळींच्या कपड्यांचं संकट, राहण्यासाठी जागेचं संकट, दवा- दारूचं संकट! आत्तापर्यंत एवढीच संकटं माहीत होती, ११८ निवडक अंतर्नाद सगळ्यांनाच त्यांना तोंड द्यावं लागत होतं. पण शौचाला कुठं जायचं हेही प्रश्नचिन्ह उमटू शकतं का? आमच्या शौचविधीवरच बंधन लादायचं होतं तर इथे आमची वस्ती का वसवली? दोन गुंठे जमिनीत आठ परिवार आणि त्यांची जनावरं कशी राहतात हे कधी अनुभवलंय त्या जोगिंदर मिसिरनं ? आज तोच धनी आहे, मालक आहे. मग प्रजेचं दुःख कळायला नको का त्याला? त्यानं स्वतःच सुविधा निर्माण करून दिल्या पाहिजेत. इथं उलट सांगावा आला - "पूरवा का डेरावाल्यांचं हगणं- मुतणं आतापासून आमच्या शेता बांधावर बंद!" असा काय गुन्हा केला होता आम्ही ? हां! एकच केलं होतं. यावेळी इलेक्शनमध्ये जाऊन मतं देऊन आलो होतो. हा काय असा मोठा गुन्हा आहे, ज्यासाठी दोन दोन पिढ्यांचं नातं विसरून गेले? बस, हुकूम करून मोकळे झाले की, आजपासून या लोकांना आमच्या बांसवाड्यावर शौचासाठी जाता येणार नाही. कुणी हुकुमाची बेदखल केली तर हरियासारखीच अवस्था केली जाईल.' हरियाबद्दल डेरावाल्यांनादेखील थोडंसं कानकोंडं वाटत होतं. एखाद्या भरल्या घरातल्या लेकी-सुनांबरोबर संबंध ठेवणं ठीक नाही. तेही श्रीविष्णुदेवाइतक्या पवित्र ब्राह्मण कुळातल्या बालविधवा झालेल्या सुनेबरोबर? हरिया चुकला, डेऱ्यावरील कोणीही हे नाकबूल करीत नाही. आता आगीत हात टाकल्यावर परिणाम भयंकर होणारच. तो झाला. या ललनवाच्या बापाकडून - परभुवाकडूनच हरियाला पकडून घेतलं होतं जोगिंदर मिसिरनं आणि दोन-दोन अल्सेशिअनना त्याच्यावर सोडलं होतं. पुरबा डेऱ्याच्या घराघरांमधून विसरायचं म्हटलं तरी ही कथा विसरली जात नाही. आज सात वर्षं झाली पण कुठल्यातरी निमित्तानं दररोज हरियाची आठवण निघतेच. जणू हीच हरियाला वाचारूपी श्रद्धांजली. पण आगीत हात घातल्यासारखं इलेक्शनच्या मतदानात काय आहे? सगळ्या पाट्यांचे नेता लोक येत होते मत मागायला, एकेका घरात शिरून हात जोडत होते आम्हांला मत द्या. आपापल्या निवडणूक चिन्हांची ओळख पटवून देत होते. त्यावरच शिवका उमटवा असं सांगत होते. पलटूनं जवळजवळ सर्वच नेत्यांना एक प्रश्न विचारला होता - "कसा असतो शिवका नि तो कसा उमटवतात ? कसा असतो मतदानाचा कागद ? आम्ही आत्तापर्यंत कधी पाहिला नाही. आम्हांला कधी कुणी वोट देऊ दिलं तर ना!” यावर येणाऱ्या प्रत्येक नेत्यानं सरकार, प्रशासन आणि इतर मतं डाकूंचा उद्धार करत त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली होती. आणि आम्हांला मतदान करण्याबद्दल पुनःपुन्हा बजावलं होतं, मग आमच्या मनातही लालसा निर्माण झाली की आपणही मत द्यायचं, मग पलटू एकदा बक्सरला जाऊन आला. आपल्या जातीच्या एका नेत्याला भेटून आला. सुखराम बाबूंनी आतापर्यंत • डेऱ्यावरच्या लोकांनी जी भीती बाळगली, त्याचा धिक्कार केला. "स्वत:च्या अधिकारांसाठी जे लढत नाहीत, त्यांना देव कधी माफ करत नाही. अरे, काही ठाऊक आहे का, की वोट न देण्याचा