पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करतात ते स्वत:च्या घरात. नाव वसतिगृह असलं तरी आहे घर... कॉलनीतल्या अनेक घरांपैकी एक. संख्या वाढली म्हणून शेजारीच मुलांसाठी नवी खोली घेतली आहे. संस्था रजिस्टर्ड आहे... कार्य आहे... कारण आहे पण राजकारण नाही... मायबाप शासन यांना ना जागा देणार, ना अनुदान. कारण ते राजकारणी नाहीत की शासकीय अधिकारी नाहीत.
 भारत-संगीतापुढे केशवसुतांच्या कविता आहेत... 'तुतारी', 'नवा शिपाई'... त्या गात म्हणत ते प्राणपणाने समाजकारणाची तुतारी फुकत आहेत. ते आहेत 'नवे शिपाई'...
 जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत,

 सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत,
 गुणगुणत ते रोज नव्या ठेचा खातात...चालत राहतात. कारण त्यांनी ही पण कविता शिकविली आहे.
 कायदा पाळा गतीचा,

 थांबला तो संपला!
 ते चालताहेत! आपण त्यांच्या हातात हात घालू! एक पाऊल त्यांच्यासाठी चालू! घासातला घास देऊ! घामातला एक थेंब त्यांच्यासाठी वाहू! खरे डोळस होऊ! समाजाचे असे सारे दृष्टिदोष दूर करू.

•••

निराळं जग निराळी माणसं/१४२