Jump to content

पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या कामात गिरीश कुलकर्णी यांना अशा लोकांनी साहाय्य केलं...जे समाजाच्या लेखी नगण्य...फसवे होते. मी तुम्हाला सांगतो रेड्यामुखी वेद गाण्याचे सामर्थ्य जे ज्ञानेश्वर दाखवतात ते असतात पट्टीचे समाज परिवर्तक...गिरीश कुलकर्णी यांनी स्नेहालयच्या माध्यमातून जी सेवा क्षितिज उभारली ती म्हणजे उपेक्षितांच्या वेदनांचे आर्त स्वर ऐकल्याने निर्माण झालेल्या विराण्या होत. मात्र ते ऐकायला तुमचे कान तानसेनाचेच हवेत.

•••

निराळं जग निराळी माणसं/११६