Jump to content

पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्मशास्त्र कारण अशी आज्ञा देतील तर ते अधर्म कृत्य केल्या सारखे होऊन धर्माचाही नाश केल्या प्रमाणे होईल. तसेंच निपुत्रिक विधवा स्त्री पुत्र व जिनगी यांच्या लोभाने दार किंवा परपुरुष यांजबरोबर संग करिते तहिी अधोगतीस प्राप्त होते. यांजकरितां या नियोगाचा कली मध्ये उपयोग नाही म्हणोन तो सोडून देऊन जो उपयुक्त नियोग तो सांगतो: श्लोक ॥ याज्ञ० ॥ यस्याः मियेतकन्यायाः वाचासत्तेकतेपतिः । तामनेनविधाने नजोविंदेतदेवरः ॥ ६१॥.. वाकदत्त म्हणजे काय ! मी अमुक नांवाचा, अमुक गोत्राचा, अमक्याचा मुलगा, नातु, मी माझी अमुक नांवाची वन्या, अमुक नांवाच्या, अमुक गोत्राच्या, अमक्याच्या मुलास विधिपूर्वक दान करितो, असे देव ब्राम्हण यांच्या सान्निध्य उच्चार करणे यास वाकदत्त असे म्हणतात. जी कन्या ज्यास वाकदत्त झाली तो मनुष्य कन्यादान घेतल्या वांचन त्या कन्येचा नवरा होतो, असें या वचनावरून होते. याजकरितां तो नवरा कन्यादान होण्या पूर्वीच मरण पावला असेल, तर त्याच्या वडील किंवा धाकट्या भावाने तिजबरोबर लग्न करावे असे बचनांत सांगितले आहे. श्लो० ॥ या०॥ यथाविध्यभिगम्येनांशुक्लवस्त्रांशुचित्रता मिथोभजेताप्रसवात्सकृत्सकहताहतौ ।। ६२॥ वरील६० वे कलमांतील वाकदत्त स्त्री, शुभवस्त्र धारण करून अंतःकरण व इंद्रियनिग्रह करणारी असल्यास त्या स्त्रीने वरलि सांगितलेले प्रकारच्या नवऱ्याने घताभ्यग व मौन या दोहोशी युक्त होऊन गभ धारण होई तो पर्यंत प्रत्येक ऋतु (विटाळशी झाल्यावर चवथे दिवसा पासून सोळा दिवस पर्यंत एकवार. एकांती संग करावा. वर सांगितलेला वाचनिक विवाह घृताभ्यंगादक नियमाप्रमाण. हेही संग करण्याचे अंगभूत आहे, म्हणान ती स्त्री दिराचीच होते असे नाही, याजकरिता तिचेठायीं उत्पन्न झालेल्या मुला विषयी पूर्वी करार झाला असेल तर दाघांचाही पत्र होतो. करार झाला नसेल तर तो पुत्र मृताचाच होतो. असे शास्त्राने नियोग करणांत सांगितले आहे. म्हणोन हा पुत्र आपल्या बापाच्या सर्व धनास अवरसा मालक होतो, हा नियोग शास्त्राने निषेध कला नाही; परंतु सांप्रत लोकरूमी नाही म्हणोन याचा विस्तार येथें संक्षेप रीतीने दाखविला असून ही नसल्या कारणाने त्याविषयी खाली निषेधही सांगितला आहे. शोक ।। स्मतिः ॥ यच्छास्त्रंलोकविद्विष्टंधर्ममप्याचरेनतु ॥ १३ ॥ माने जो एखादा धर्म सांगितला असून तो लोक रूढीस विरुद्ध असेल तर माणे आचरण न करितां या प्रसंगी लोक रूढी प्रमाणे वागावें. ढी अशी नाही हा लोकरूढी नसल्या का शास्त्रानें जो त्या प्रमाणे आचरण