Jump to content

पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दत्तक प्रकरण ऋक्थेजनयितर्नमजेदात्रमःसुतइत्यादिस्मृतिभिः ॥ जनयित्पुत्रत्वाभावातपुत्रपौत्रैऋणदेयमितिविधिरेवनप्रसज्यतइतिबोध्यंशी नकयाज्ञवल्क्यवचनात् ॥ २४ ॥ - अ या नांवाच्या मनुष्याने दत्तक होण्याचे पूर्वी कर्ज करून ते न फेडतां आई बाप यानी दत्तक दिल्या कारणाने ब यास दत्तक झाला; पुढे पहिल्या घराण्यांतील आई बाप मयत झाले असून त्यांजला दुसरे कोणी वारस नसतां त्यांची इस्टेट ही माही, या कारणाने सावकार याणे दत्तकावर पहिल्या कर्जावद्दल फिर्याद केली तर ती फिर्याद सदई दत्तकावर चालेल किंवा नाही? अशी शंका घेऊन निवारणःपहिले घरी असतां कर्ज करून नंतर दत्तक झाला असेल तरी दत्तक झाल्यावर कर्जाचे जबाबदारीतून तो मोकळा होत नाही; याजकरितां ज्या घरी दत्तक झाला स्या घरी त्याची तेथे मिळकत असेल त्या मिळकतीवर किंवा खद्द त्याजवरच फिर्यादीचा निवाडा होण्यास हरकत नाही. श्लोक ॥ अत्रिः॥ अपुत्रेणैवकर्तव्यःपुत्र प्रतिनिधि सदेतिवचनात्पूर्वगृहीतदत्तकोयद्यशास्त्रीयोअन्यायोवाचेत्सनिवर्तयितव्यः॥ द्वितीयोग्रात्यश्च अपुत्रत्वरूपाधिकारित्वस्यनिराबाधात् ॥२५॥ अहिणे व या नांवाचा पुत्र दत्तक घेतला असून पुनः ती दुसरा घेण्यास इच्छिते तर तिजला दत्तक घेण्याचा अधिकार आहे किंवा नाही. अशी शंका घेऊन निवारणः-जर अहिणे पूर्वी ब या नांवाचा घेतलेला दत्तक वरील नियमा प्रमाणे विधियुक्त व घेण्यास लायक नसोन घेतला असेल तर मात्र तो रद्द होऊन दुसरा दत्तक घेण्यास हरकत नाही. जर तो घेण्यास लायक असोन विधियुक्तही घेतला असेल तर जो पर्यंत तो दत्तक पुत्र किंवा त्यांचे पुत्र पौत्रादिक वंशज जीवंत असतील तो पर्यंत पुन:दत्तक घेण्यास काही मार्ग नाही असे समजले पाहिजे. • काशीनाथोपाध्यायविरचिते धर्मसिंधु सारे तृतीयपरिच्छेदे दत्तकप्रकरणस्थमे तद्वाक्यं ॥ असंभवेसगोत्रसपिंडेषुकृतोपनयनोपिविवाहितोऽपिदत्तकोभवति ॥ असंजातपुत्रएवविवाहितोग्राह्यइतिमेप्रतिभाति ॥ २६ ॥ अ या नांवाचे मनुष्यास ब व क असे दोन पुत्र असता त्या पुत्रांपैकी ब यांस पहिल्या घरी एक पुत्र झाला असोन अने ड यास ब याजला विधिपूर्वक दत्तक दिला, नंतर व हा आपल्या बायकोसहवर्तमान दत्तक घरी गेल्या नंतर त्यास तेथें दोन पुत्र होऊन पुढे व हा मयत झाला. काही दिवसांनी ब याजला पहिल्या घरी