Jump to content

पान:दूध व दुभते.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१ लें]. शेतकरी आणि दुभती जनावरें. wwwwwwwwwwanmaina गोकुलाविषयी थोडीशी माहिती. __ हिंदुस्थानांत दुधाकरितां पाळलेल्या जनावरांत गाई-म्हशी हीच मुख्य आहेत. तेव्हां त्यांचेविषयी येथे थोडी माहिती देणे योग्य आहे. ही जनावरें सस्तन चतुष्पाद प्राण्यांचे तृणमक्षक पोटविभागात मोडतात व यांचे कुलास 'गोकुल' असें म्हणतात. ह्या कुलाच्या जाती व पोटजाती पुष्कळ आहेत. आणि हे विभाग, त्यांचे निरनिराळे अवयवांची ठेवण, त्यांची विशिष्ट कामें करण्यासंबंधानें पात्रापात्रता वगैरे गोष्टींवरूनच केलेले आहेत. ह्या कुलाचे पाश्चिमात्य कुल" आणि " भारतीय कुल " असे दोन मोठे विभाग केलेले आहेत. ह्यांपैकी पाश्चिमात्य गाई बैलांना वशिंड नसते, शेपटीजवळ त्यांचा पुठ्ठा अणकुचीदार झालेला असतो, त्यांचे कान टोकदार नसून ते नेहमी उभारलेले असतात. शिंगें फारच नाजूक असून लांब व पुढे आलेली असतात. लांबी त्यांचे उंचीचे मानाने अधिक असते. त्यांची मान लठ्ठ व आंखड असन साधारणपणे तीस पोळी असत नाही, त्यांचे कपाळ नेहमी सपाट असते. भारतीय गाई-बैलांचा पुट्ठा शेपटीजवळ गोल असतो, त्यांस वशिंड, पोळी, अणकुचीदार कान व बळकट शिंगें ही असतात. त्यांची उंची त्यांचे लांबीचे मानानें बेताची असते. सर्व जनावरांत गाई-बैल हेच प्राणी प्रथम माणसाळलेले आहेत. तरी हल्लीच्या काळी देखील हे रानटी स्थितीत आढळतात. उदाहरणार्थ, हिमालयांतील वनगाई, गवे, वगैरे. म्हशींची जात गाईचे अगदी जवळची आहे. व ही जात गाईचे पुष्कळच मागाहून माणसाळलेली असली पाहिजे असें पुष्कळ कारणांवरून अनुमान निघते. गाईप्रमाणे म्हशी रानटी स्थितीत सांपडतात, गाई-म्हशींची राहणी एकमेकांपासून फारच भिन्न आहे. म्हशींचे स्वाभाविक वसतिस्थान म्हटले म्हणजे नदीकिनारे व दलदलीच्या जागा ह्या होत. आणि म्हणूनच म्हशीस चिखलाचे डबके पाहिल्याबरोबर अत्यानंद होऊन त्यांत तासांचे तास ती लोळत पडते. गाईची गोष्ट ह्याच्या अगदी उलट आहे. तिला उंच कोरडे रान, वहातें स्वच्छ पाणी व समशीतोष्ण हवामान हीच आवडतात." भारतीय गोकुलाचे पोटविभाग. दूध-दुभत्याकरितां प्रसिद्ध असलेल्या जातीची थोडक्यात माहिती खाली दिल्याप्रमाणे आहे.. सिंधी-ही : अवलाद सिंघदेशाचे खालचे भागांत व विशेषेरून कराचीचे आसपास आढळते, व कराचीस यांचा व्यापार बराच चालतो. ही अवलाद लहान बांध्याची असून लांबीचे मानाने उंची बेताचीच असते.