पान:तुतीपासून रेशीम.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७६ अनुभव नसतो, हेंच असतें. कित्येक ह्मणतात, हवा मान- वत नाहीं; कित्येक ह्मणतात, परिस्थिति अनकूल नाहीं. पण हीं कारणें निदान आमच्या महाराष्ट्रास तरी अगदीं विसंगत दिसतात. हवेच्या मानानें पाहिलें, तर रेशमाच्या किड्यांच्या संगोपनास आमचे इकडील हवा सर्वथैव निरुपयोगी आहे, असें कधीं ह्मणतां यावयाचें नाहीं. महाराष्ट्रांतील कित्येक ठिकाणीं हवा उष्ण असल्याकारणानें कोणी ह्मणेल कीं, ती किड्यांस बाधक आहे. पण आमचे अनुभवावरून ही त्यांची समजूत भ्रांतिमूलक आहे. हैदराबाद ( दक्षिण ), लाहोर, वगैरे ठिकाणी आमचे महाराष्ट्रापेक्षांही प्रखर उष्णता उन्हाळ्यांत • असते. तरी वरील दोन्ही ठिकाणीं मे महिन्यांत आह्मी उत्तम तऱ्हेनें रेशमाचे किडे पाळून पिके घेतलीं. त्यावरून आह्मी खास झणूं शकतों कीं, महाराष्ट्रांतील हवा किड्यांस मानवत नाहीं, असें जें कित्येक ह्मणतात, ती त्यांची निव्वळ चूक आहे. आमच्या सह्याद्रिपर्वतावरील डोंगरी प्रदेशाची हवा किड्यांस मानवेल कीं नाहीं, असा प्रश्नच उद्भवणें शक्य नाहीं. कारण, अति उष्णतेचे दिवसांत देखील तेथील हवा थंड असते, हें सर्वश्रुतच आहे. फक्त पावसाळ्याचे तीन महिने मात्र तेथें अति पाऊस असल्यानें कांहीं दिवस विशेष व्यवस्था करावी लागेल, इतकेंच. बाकी अशा ठिकाणीं बारमहा किडे व्यापारी दृष्टीनें सहज पाळतां येतील. पाव- साळ्यांत हवा अति दमट असते; व कित्येक ठिकाणीं महिना दोन महिने सूर्यदर्शनही होत नाहीं, इतका एकसारखा पाऊस