पान:तुतीपासून रेशीम.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७३ लागवड करावी; ह्मणजे ती जमीन सहजीं अवांतर जमिनीच्या उंचवट्याची होते. वरील खर्चात कोसल्यांस वाफ देण्याच्या भट्टीचा खर्च घातला नाहीं. कारण, अशा लहान प्रमाणावर किडे पाळून रेशीम करणारास तसल्या भट्टीचें काम रेशीम उकलण्याच्या भट्टीवरच भागवितां येतें. रेशीम उकलण्याच्या भट्टींत पाणी घालून त्या कढईवर टोपली, आंत पाणी न जाईल अशी, बसवावी व त्यांत ज्यास वाफ द्यावयाची असेल, असे कोसले घालून तरट कापडानीं त्यास झाकावें; तें असें कीं, कढईतील पाण्याची वाफ जी टोपलीच्या छिद्रांतून कोसल्यांस आक्रमीत असते, तीस सहजासहजी बाहेर पडतां येऊ नये. अशा तऱ्हेने त्या भट्टीवरच कोसल्यांस वाफ देण्याचें काम भागवून घेतां येतें. बंगालमधील कोसल्यांचें रेशीम काढणारी मंडळी त्यांचें रेशीम उकलण्याचें काम झाल्यावर वरप्रमाणें टोकरीत दुसरे दिवसास उकलण्यास लागणारे कोसले घालून भट्टीखाली ' लांकडें घालून ठेवून देतात. ह्मणजे दुसरे दिवसा पावेतों ते कोसले वाफवले जाऊन उकलण्याजोगे आपोआप होतात. एक वेळ सरपण भट्टीत घातल्यावर पुन्हां दुसऱ्यानें अशा रीतीनें सरपण घालण्याची कोसल्यांस वाफ देतांना जरूर नसते. वर दिलेला साहित्य तयार करण्याचा खर्च पहिल्याच साली करावयाचा असतो, व पुढे त्याचा उपयोग दरसाल