Jump to content

पान:तर्कशास्त्र.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला. ३७ ध्यतीपर्यत एकांच प्रकारच्या पदार्थीचीं वर्गीकरणें कैलेलीं आहेत ही गोष्ट गृहीत धरली आहे. परंतु आपल्या दृष्टीसमेोर येणा-या असंख्य पदार्थीचे, सोय दिसेल व गरज पडेल त्याप्रमाणें आपण वर्ग करिता; व वर दिलेल्या कोष्टकांतील परंपरेप्रमाणें व्यवस्थित परंपरा कांहीं थोड्या ज्ञास्त्रांतच फक्त सांपडेल. वनस्पति, ग्रह, संपति, उत्क्रांति, सदुण इत्यादि जाति 'भूत? यासारख्या एकाद्या 'सत्ते'च्या खालीं फारं• तर ठेवितां येतील, याशिवाय त्यांचा दुसरा कोणताही परस्परसंबंध दाखवितां येणार नाहीं. अर्थात् त्यांची परस्पराशीं तुलना करून त्यांच्या संख्यागमाचें व गुणागमाचें सापेक्षत्वही मुळीच दाखवितां येणार नाहीं. २९. जेव्हां एका जातीच्या संख्यागमामध्यें दुस-वा जातीचा समावेश होतो तेव्हां पहिल्या जातीची दुसरी जाति 'अधीन' आहे असें म्हणतात. उदाहरणार्थ, * सस्तन प्राणी' या जातीची ' मांसभक्षक? ही जाति अधीन आहे. एकाच 'पर' जातीमध्यें अनेक ’ अपर? जातींचा समावेश झाला असेल तर त्या सर्व 'अपर' जातींस ' सम? जाति असें ह्मणतात. उदाहरणार्थ, ‘ पृष्टवंशयुत प्राणी' या एकाच 'पर' जातीमध्यें ज्यांचा समावेश होत आहे अशा ' पक्षी' 'सस्तन प्राणी? ‘मासे’ व * सरपटणारे प्राणी' या समजाती आहेत. जेव्हां जातींचा थोडाबहूत एकमेकांमध्यें समावेश होतो तेव्हां त्यास परस्परानुमवेशी जाति अर्से ह्मणतात, उदाहरणार्थ, 'पद्य लिहिणारे' व 'कथा लिहिणारे.’ ‘कथा लिहिणारे' असे कांहीं ग्रंथकार आहेत की ते आपल्या सर्व कथा