पान:तर्कशास्त्र.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. १६७ य्यानं केलेलें असेल. या पैकीं स्वतःचा अनुभव थोडा असला तरी तो फारच मूल्यवान आहे; कारण कोणताही एक ठोकळ नियम चहूंकडे सारखा लागू करतां येत नाहीं, हें आपणांस स्वतःला ठोकर बसल्याशिवाय पूर्णपणें कळत नाहीं. याच कारणाकरितां, केवळ शाळेत किंवा पुस्तकांतून मिळालेलें ज्ञान व्यवहारज्ञानाऐवजीं कधीही उपयोगी पडावयाचें नाहीं; व असे अनेक स्वानुभव असतात, कीं ते जरी महत्प्रयासानें मिळालेले असले, तरी त्यांची उपयुत्तता पाहूं गेलें असतां, ते मिळविण्यास जे श्रम व कष्ट सोसावे लागले ते कांहींच नाहांत असें ह्मणावें लागतें. परंतु दुस-या पक्षी, हेंही ध्यानांत ठेविलें पाहिजे कीं, स्वतूचें अवलेोकन कितीही विस्तू झाले तरी तें नेहर्मी पारमितच असणार, व मनुष्यवृगशी सघट्टन ठवून व वृश्च नानं, ते न वाढवल्यास, त सकुांचत व एकदशाय हाऊ लागतें. कोणत्याही मनुष्याच्या ज्ञानाचा बराच मोठा भाग इतरांच्या अनुभवापासूनच त्यास मिळालेला असतो, व हें ज्ञान त्यास तोंडी शिक्षणानें किंवा पुस्तकांपासून मिळालेलं असतें. व त्यांतील सर्वांत महत्वाचा भाग ह्मटला ह्मणजे पदार्थातील सूक्ष्म भेद व शास्त्रीय सिद्धांत हे होत. व त्यापैकीं कांहीं इतके गहन आहेत कीं ते शोधून काढण्यास या पृथ्वीवरील अत्यंत श्रेष्ट मनुष्यांनां आपलें बुद्धिसर्वस्व खर्चावं लागलें, व कांहींचा शोध लागण्यास बरीच शतकें लागलीं. १८. आजपर्यंत असे पुष्कळ सिद्धांत प्रसिद्ध झाले आहेत. उदाहरणार्थ, सृष्टपदार्थासंबंधी सिद्धांत (जसें,