पान:तर्कशास्त्र.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ तर्कशास्त्र. ३६. वक्र स्थित्यंतर. दोन विसंवादी सिद्धांतांपैकी एक खरा व दुसरा खोटा असलाच पाहिजे-याच तत्वावर वक्र स्थित्यंतर करितां येतें. हें स्थित्यंतर करितांना, मूळ निगमन खरें आहे असें सिद्ध करण्याऐवजीं, त्याचा विसंवादी सिद्धांत खोटा आहे असें आपण सिद्ध करून दाखवितों. दुस-या हेतुस्थितींतील अओओ, व तिस-यां- तील ओअओ या दोन संधीचें स्थित्यंतर याच रीतीनें होतें, व तें कसें करावें हैं सूत्रांतील कवीडी व कोगयी या दोन शब्दां दर्शविलें आहे. या शब्दांतील व्हें व्यजन असें दर्शवितें कीं, तें ज्या स्वराशीं संयुक्त झालें आहे त्या स्वरानें दर्शविलंला सिद्धांत सोडून द्यावा, व त्याचें ऐवजीं निगमनाचा विसंवादी सिद्धांत घेऊन, निराळेंच निगमन काढावें. जसें, को, कांहीं कवी विद्वान नसतात, ग, कवी बुद्धिमान असतात, यी. कांहीं बुद्धिमान मनुष्यें विद्वान नसतात. हैं निगमन जर खरें नसेल तर त्याचा विसंवादी सिद्धांत ' सर्व बुद्धिमान मनुष्यें विद्वान असतात' हा खरा असला पाहिजे. हा महत्प्रतिज्ञेच्या जागीं ठेवू क. सर्व बुद्धिमान मनुष्यें विद्वान असतात, म. सर्व कवी बुद्धिमान असतात, ळ. सर्व कवी विद्वान असतात. vM हैं निगमन मुथुम दिलेल्या महत्प्रतिज्ञेचें विसंवादी अहैि, म्हणुन अर्थात खोटें असलें पाहिजे. परंतु ज्या अर्थी निगमन