Jump to content

पान:तरंग अंतरंग.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

क्षणापर्यंतच्या प्रवासासाठीची ती हृदयात घट्ट सांभाळायची सुदाम्याची पुरचुंडी असते ! घराची आठवण आली की मग मात्र उठावं ! लगबगीनं घरटं गाठावं ! थोडं जरी कुणी कळत न कळत दुखावलं गेलं असेल तर उद्यापासून एकेकाला भेटून, एकादं हलकंफुलकं दीर्घकाल आठवणीत राहणारं स्मृतिचिन्ह द्यावं, हातात चिमूटभर साखर द्यावी आणि आपला मावळतीचा प्रवास सुखकर करायचा निश्चय करून मिठीत गाढ निद्रेचा कैफ झिंगावा ! तरंग अंतरंग / ९४