Jump to content

पान:तरंग अंतरंग.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असावी की काय? हे अजूनही आमच्यासाठी एक भयानक कोडं आहे. 'ती' हताश जोडी पुन्हा अश्रू गाळू लागली, इतकं सुंदर मानवशिल्प निर्माण करूनही पदरी पराभव आला. मी मात्र पुढच्या जन्मासाठी मनोमनी काही भगीरथ प्रयत्न करायचं वचन देऊन मुकाट मागं फिरलो. खिन्न होऊन निर्जीव आत्म्याला काखोटीला मारून... जड-जड पाऊली..... मनात फक्त कोरडा उद्घोष करत..... दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछिल तो ते लाहो। प्राणिजात। तरंग अंतरंग / ८४