Jump to content

पान:डी व्हँलरा.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ डी व्हॅलेरा मध्ये विरोध नसता तर आज ज्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठीं सभा व्हावयाचे घाटत आहे तो प्रश्नच उद्भवला नसता. असले बिकट प्रश्न सोडविण्याच्या वेळीं ते सोडविणारे लोक प्रत्यक्ष परिस्थितीशिवाय दुस-या कोणत्याही पूर्वग्रहांनी आपली मने दूषित होऊ न देतां कामाला लागले तरच कांहीं फलनिष्पत्ति होईल हे उघड आहे. इमॉन डी व्हॅलेरा. त्याच दिवशी मुख्य प्रधानांकडून डी व्हॅलेरास तारेनें उलट उत्तर आले ते असेंः* महाराज, तुम्ही काल रात्रीं तारेनें जो मजकूर मला कळविला तो समजला. स्वतंत्र राष्ट्राचे प्रतिनिधि या नात्याने तुमच्याशी आम्हीं वाटाघाट केली तर ती पूर्वग्रहदूषित' होणार नाही असे म्हणणे म्हणजे कांहीं तरी बोलण्यासारखे आहे. तुमच्या प्रतिनिधींचे अशा रीतीने स्वागत करणे म्हणजेच मुळीं साम्राज्यांतून आयर्लंड बाहेर पडल्याचे कबूल करण्यासारखे होईल. अशा वाटाघाटीनंतर तुमची मर्जी लागली तर तुम्ही राजेसाहेबांशी मित्रत्त्वाचा तहनामा कराल हे खरे. पण त्याबरोबरच हेही खरें, कीं तसला तहनामा न करता तुम्ही दुस-याच एखाद्या राष्ट्राशीं दोस्तीचा तहही करू शकाल. म्हणून माझ्या पूर्वीच्या पत्रांत दिग्दर्शित केलेली भूमिका सोडण्यास आम्ही तयार नाहीं. राजनिष्ठेच्या तत्त्वावरच साम्राज्याची सारी इमारत आज घटकेला उभी आहे. ते तत्त्व रतिभरदेखील ढळलेले आम्ही सहन करणार नाही. स्वतंत्र राष्ट्राचे प्रतिनिधि म्हणून तुम्हांस येऊ देणे म्हणजे त्या तत्त्वाची पायमल्ली होऊ देण्यासारखे आहे. तुम्ही जोपर्यंत तसे येण्याचा हुई धरतां तोपर्यंत आपल्यामध्ये वाटाघाट होणे शक्य नाहीं. डी. लॉइड जॉर्ज.। यावर डी व्हलेराने तारेनें प्रत्युत्तर दिले. त्यांत म्हटले होते, कीं:-