Jump to content

पान:डी व्हँलरा.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९५ तह झाला पण सिंह गेला करणारे आयर्लंडचे पार्लमेंट असावें. आयर्लंडच्या सरकारला * आयरिश फ्री स्टेट' (आयर्लंडचे स्वतंत्र राज्य ) असे नांव असावें. | ( २ ) कानडा वगैरे साम्राज्यांतर्गत राज्यांप्रमाणेच आयर्लंडचे व ब्रिटिश पार्लमेंटचे नाते असावे. | ( ३ ) कानडा येथे ज्याप्रमाणे गव्हर्नर जनरल नेमण्यांत येतो त्याप्रमाणेच बादशहांचा प्रतिनिधि म्हणून आयलंडमध्ये गव्हर्नर जनरल नेमण्यांत यावा. । ( ४ ) मी आयरिश फ्री स्टेटशीं व त्याप्रमाणेच पंचम जॉर्ज बादशहा व त्यांचे वारस यांच्याशीं राजनिष्ठ राहीन अशी आयरिश पार्लमेंटच्या प्रत्येक सभासदानें शपथ घ्यावी. याखेरीज राज्यव्यवस्थेच्या निरनिराळ्या तपशिलांविषयीं इतरही पुष्कळ कलमें होतीं, व विशेष महत्त्वाची गोष्ट ही, कीं एका कलमांत असे म्हटले होते, कीं उत्तर आयलंडने ‘आयरिश फ्री स्टेट'मध्ये सामील व्हावयाचे किंवा नाहीं तें १९२० च्या कायद्याप्रमाणे अस्तित्वात आलेल्या उत्तर आयर्लंडच्या सरकारच्या मर्जीवर अवलंबून असावे, व आपली राज्यव्यवस्था विभक्त असावी असे त्या सरकारने ठरविले तर एक कमिशन येमण्यांत मेऊन त्याच्या मार्फत उत्तर व दक्षिण आयर्लंडच्या सरहद्दी निश्चित करण्यात याव्या. | अशा स्वरूपाचा हा तहाचा मसुदा होता. साम्राज्यांतर्गत मान्यता डी व्हॅलेरास कधीच कबूल नव्हती, ब्रिटनशीं राजनिष्ठ सहण्याच्या शपथेविरुद्ध तो पहिल्यापासून होता, व आयर्लंडमध्ये उत्तर सरकार व दक्षिण सरकार असे दोन सवते सुभे असावेत या कल्पनेचा त्याने नेहमीं निषेधच केला होता. अशा स्वरूपाचा होऊ घातलेला तह डी व्हॅलेरास नको होता यांत मुळीच आश्चर्य नाहीं. हा तह नको तर मग कोणत्या प्रकारचा तह पाहिजे असा कोणी प्रश्न केला तर त्याला डी व्हॅलेराचे उत्तर तयार होते. आयलंडच्या राजकीय आकांक्षा