पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आणावेत. याशिवाय ज्या एका ठरावीक घटनेमुळे, किंवा चुकीमुळे राग आला आहे तीच जर 'आपल्या हातून घडली असती तर काय झाले असते ?' हा विचार करावा. सर्वांत महत्त्वाची गोष्ट - 'राग आल्यानंतर आपल्याला ताण येणार आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक व्याधी जडणार. आपले आयुष्य कमी होणार.' हा स्वार्थी विचार तरी करावा. म्हणजे राग आपोआप कमी होईल. सर्व सजीव सृष्टीत सर्वोत्कृष्ट असणान्या आपल्या या मनुष्यजन्मात आपल्याला उपद्रव देणाऱ्या किडा-मुंगी-डास यांना आपण मारतो. पण सारे जीवन वाळवीसारखे पोखरून काढणाऱ्या, आपल्याला क्षणात पशू बनविणाऱ्याा, मनाचा समतोल बिघडविणाऱ्या अनेक व्याधींना आमंत्रण देणाऱ्या, आयुष्याची लांबी-रुंदी-खोली कमी करणाऱ्या, इतरांपासून शरीर- मनाने दूर नेणाऱ्या आणि स्वत:च्या व भोवतालच्या व्यक्तींच्या जीवनातील आनंद हिरावून घेणाऱ्या राग या रोगाला कधी मारणार ? राग नावाचा रोग । ५३