Jump to content

पान:गोमंतक परिचय.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५७ प्रकरण ६ वें हिंदूंच्या दृष्टीने पाहिल्यास याच सुमाराला हिंदूंनी लिसेवीय शिक्षणांत शिरकाव केला. पूर्वीच्या दुय्यम शिक्षणाचा पूर्ण अभ्यासक्रम पार पाडलेला एकाददुसराच हिंदु दिसे. फार करून थोडे ल्याटिन, फ्रेंच, इंग्रजी किंवा गणीत इतके विषय शिकून हिंदुविद्यार्थी पूर्वी अभ्यासक्रम सोडीत असत. आधुनिक इयत्तावार लिसेवांतून उत्तीर्ण झालेले पहिलेच हिंदू म्हणजे तूर्त नव्या काबिजादीतर्फे सरकारसल्लागार मंडळांत निवडून आलेले प्रतिनिधि, श्री. नारायण अनंत शेट बांदोडकर हेच होत. हे जातीने वैश्य आहेत. त्यांनी पांचव्या वर्षीची परिक्षा १९०३ साली दिली. १९०१ साली प्रस्तुत लेखक लिसेवांत दाखल झाला तेव्हां त्यांतील १६२ विद्यार्थ्यांत केवळ २५ च हिंदु विद्यार्थी होते। शिक्षणक्रमाची वाटणी व परिक्षाः-पोर्तुगीज, ल्याटिन, अंकगणीत, भूमिति, चित्रकला, प्राणिशास्त्र व वनस्पतिशास्त्र याची मूलतत्वे आणि भूगोल इतिहास हे विषय प्रथम वर्षापासूनच सुरू होत; दुसऱ्या वर्षी यांशिवाय फ्रेंच भाषा जास्त येई; तिसऱ्या वर्षी पूर्वीच्या विषयांशिवाय इंग्रजी किंवा जर्मन यापैकी एक भाषा, फर्स्ट ग्रेड एक्वेशन्स पर्यंत विजगणीत व सृष्ट शास्त्रांच्या जोडीस रसायनशास्त्र व पदार्थविज्ञानशास्त्र येऊन पुढे पांचव्या वर्षां पर्यंत चालत. प्रथमच्या चार वर्षातून शाळेत भरपूर मार्क असणारांना परिक्षा निराळी द्यावी लागत नसे. अपुऱ्या मार्कानींच येणाऱ्यानां ती द्यावी लागत असे. त्याचप्रमाणे पांचव्या वर्षीही परिक्षा असे. साऱ्या परिक्षा शिक्षकच घेत व त्या काही भाग तोंडी तर कांहीं लेखी घेऊन पूर्ण कराव्या लागत. शिक्षणाची फी:-दर साल प्रवेशफीचे २१०० रेस व केवळ यशस्वी विद्यार्थ्यानांच वर्ष पुरे होतानां २१०० रेंस मिळून ४२०० रेंस फी भरावी लागे. म्हणजे रुपयाचा दर ४०० रेस असतानां साडे दहा रुपये व ३५० रेस असतांना बारा रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला पडत. लागोपाठ पास होणाऱ्या विद्यार्थ्याला एकंदर अभ्यासक्रमास ५२॥ किंवा ६० रुपये फीचा खर्च येई. दुय्यम शिक्षणप्रसाराचे मानः--विसाव्या शतकांत प्रवेश करतांच दुय्यम शिक्षणप्रसाराचा आढावा घेणें अनाठायीं होणार नाही. शिवाय विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकापासूनच रिपब्लिकची अमदानी सुरू होत असल्याने, हिंदुसमाजाने त्या अवधींत जो जोराचा प्रयत्न केला व सर्वच बाबतीत त्यांनी जी जोराची मुसंडी मारली तिचें प्रगतिमान पहावयाला देखील हे कोष्टक उपयुक्तच ठरेल.