Jump to content

पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१२४] करून पाहिजे तिकडे व पाहिजे तसे फेरफटके करण्याची मुभा आहे. तसें चरित्रकाराला करता येत नाही. चरित्र- काराचा स्वतःचा अनुभव, त्याला मिळालेली माहिति, दप्तरचे दाखले व प्रत्यक्ष प्रमाण, हे त्यांचे साहित्य. या साहित्यप्रदेशाच्या पलीकडे त्याला जाता येत नाही, कारण त्याचे लिहिणे लोकांच्या अनुभवाला मिळते असले पाहिजे हणून त्याला आपले काम फार संभाळून करावे लागते. ते कसे झाले आहे याचा निर्णय आतां वाचकच करतील.