Jump to content

पान:केरळ कोकीळ.pdf/710

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. अक्टोबर १९०१. २३७ रहाटी चक्रनेमिक आहे. तें चक्र गुरुत्वमध्याच्या समोरासमोर आले की, पुन्हा उलट फिरूं लागावयाचे. त्याप्रमाणे ह्याच्यापुढे मजल गेली झणजे तीही लोकोत्तरच समजावयाची. तेव्हां अर्थात् वर 'ये' आणि खाली वें' असें यमक आणणे हीही लोंब्यांची रचना लोकोत्तर खरी ! त्याच्याच खालचें पद्यः-- खर्चुन वित्त उभवून विशाल हा । निर्मूनियां उपवनाजवळी सुरम्या ॥ बांधून आंत जलपूरित कूप थोर । व्हावें स्वकीय मनि धन्य सदा अपार ॥१२॥ 'हा' आणि 'सुरम्या' 'थोर' आणि 'अपार' ही यमकें ! 'हा' हा येवढा जाडा व अपरिचित शब्द कां? तर यमक जुळविण्यासाठी. असे अपरिचित शब्द भलत्याच ठिकाणी योजून वाकळेला शालजोडीचे ठिगळ लावणे, हे शुद्ध हठकवित्वाचे लक्षण आहे. शेवटच्या चरणांतील अर्थस्वारस्यांत तर कांहींच मजा नाही. "पैसे खर्चुन मोठमोठे वाडे बांधून, त्यांच्या सभोवार रमणीय अशा बागा तयार कराव्यात. व त्यांत मोठमोठाल्या पाण्याने भरलेल्या विहिरी बांधून, झापले इष्ट आप्त मनामध्ये अत्यंत धन्य व्हावेत." किती 'टुमदार' शुद्ध वाक्यरचना ही!-यापेक्षां 'आपल्या देशबांधवांना तृप्त करावेत–सुखी करावेत' असें झटले असते, तर तें वाक्य शुद्ध होऊन कांहीं अर्थ तरी आला असता. उंटाच्या मानेतील सरळपणा इतकाच वरील वाक्यांत सरळपणा आहे. खालील नियमांत किती तुटकपणा आला आहे पहाः उष्णांत काम करितां सुख सावलीत । जो सावलीत सुख त्यास गमे उन्हांत ॥ १ ॥ उन्हांतून चालतांना थकून सावलीत बसलेला प्रवाशी उन्हांत सुख आहे ही गोष्ट कबूल करील काय ? कवीने सांगितलेला नियम जरी खरा आहे, तरी त्यास तो स्पष्ट सांगतां आला नाही. त्यांचा करा सदुपयोग झटून लोकीं । तें ईश्वरास रुचते अवघे विलोकी ॥६१॥ ह्या पद्यांतील पहिल्या चरणांतील 'करा' हे क्रियापद अनेकवचनी आहे; आणि दुसऱ्या चरणांतील 'विलोकीं' हे क्रियापद एकवचनी आहे ! असा पूर्वापार विरोध ठेवणे हेही चांगले नव्हे. आता आणखी काही शब्दवैचिच्याची उदाहरणे:"विद्युल्लता पडुनियां सकलांस मारी । भी ही जनांस गमली बहु आजवेरी॥"