पान:केरळ कोकीळ.pdf/643

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. आपल्या भक्ष्याच्या शोधाला बहुतेक कधी जातच नाही झटले तरी चालेल. तो आपले स्वतःचे पोषण सुद्धां कचितच करतो. एका कांचेच्या पेटीमध्ये धनी जातीच्या कांहीं मुंग्या घालून कित्येक प्रयोग करून पाहिले होते. त्या पेटीत त्यांची कांहीं मोडकी तोडकी घरे व भक्ष्य टाकून ठेवले होते. पण त्यांची तेथें जी तारांबळ उडाली ती सांगतां सोय नाही. त्या एखाद्या बावळट, खुळ्या व उघड्या पडलेल्या गर्भश्रीमंताप्रमाणे बापुडवाण्या दिसू लागल्या. त्या हिकडून तिकडे आणि तिकडून हिकडे उगाच धांवत. पुढे काय करावे हे त्यांना काडीमात्र सुचेना. ह्मणून त्यांच्यांत एक गुलाम जातीची मुंगी नेऊन सोडली. तेव्हां त्यांचे बुद्धिमांद्य तत्काल उघडे पडले. आणि त्यांची सारीच वस्तुस्थिति बदलली. हा गुलाम त्या राक्षसांमध्ये केवळ बुटुबैंगन दिसत होता. दाई जसे मुलांचें लालनपालन करते, त्याप्रमाणे तो आपल्या धन्यांचे पालनपोषण करूं लागला. त्याने त्यांस खाऊं जेऊ घातले, आणि तो तेथील मोडकी तोडकी घरे दुरुस्त करण्यात च्या खटपटीस लागला. त्यांच्यामध्ये शूर लढवय्या मुंग्याही असतात. त्या इतक्या सारख्या व भयंकर रीतीने लढतात की, एखादी जात काबिज करतांना त्यांची फारच मोठी रणकंदने माजतात. त्यांच्यांतील योद्धे इतके निकराने लढतात की, त्यांचे मागच्या आंगचे अर्धे अर्धे देह तुटून गेले तरी, त्यांची त्यांना दाद नसते. पुष्कळ वेळपर्यंत ती कबंधेच आवेशाने शत्रूवर हल्ला करित असतात. खरोखर दोन लढवय्या मुंग्यांची गांठ पडली की, एक तरी चकमक झडल्यावांचून सुध्या भेटतात, असे प्रसंग फारच क्वचित् ! तरी त्यांच्या युद्धामध्ये एक विविक्षित कायदा अगदी जारीने पाळलेला दृष्टीस पडतो. तो हा की, एका वीराने दुसऱ्या वीराला चित केले की लागलीच ते प्रेत, काही ठरीव लहान लहान मुंग्या घराकडे घेऊन जातात. ह्मणजे मनुष्यांच्या युद्धांतील प्रेत वाहून नेणाऱ्या डोल्यांप्रमाणेच हुबेहुब ही चाल आहे असें मटले पाहिजे. कित्येक मुंग्या भिंती घालून त्यांवर छावण्या बांधतात. आणि ते काम इतके चोख करतात की, जणों काय शिल्पशास्त्रवेत्त्यांनीच ते उभे केलें आहे! ह्या प्राण्यांचे असंख्य थवेच्या थवे, आपआपल्या मस्तकावर