Jump to content

पान:केरळ कोकीळ.pdf/412

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्तेंबर १८९९. १९९ तांनी 'पंचवटी'च्या वादासंबंधाने आणखी कोणकोणते लेख प्रसिद्ध झाले आहेत, ह्मणून विचारपूस केली. तेव्हां त्यांत 'केरळकोकिळास काव्यसंग्रहाची सलामी' ह्मणून एक पुस्तक बाहेर पडल्याचे त्यांस समजले. तेव्हां तें विकत आणण्यासाठी श्रीमंतांची खारी निर्णयसागर' छापखान्यांत गेली. ह्या गोष्टीस पुरते चार दिवसही लोटले नाहीत, तोंच त्यांचे निधनवृत्त कर्णीवर येऊन डोळ्यांपुढे एकदम आंधारी आली! हे दुःखदायक वृत्त क्षणभर खरेही वाटेना. पण असली अमंगळ बातमी खोटी कोठून होणार ? असो. ईश्वरी इच्छेपुढे मानवी आशा व्यर्थ होत. श्रीमंत बापूसाहेब गेले-ह्मणजे एका नामांकित बाणेदार सरदारांचा-संस्थानिकांचा-अखंड वियोग झाला; एक रसिकाग्रणी नाहीसा झाला; नामांकित कवि अस्तास गेला; एका तत्त्वजिज्ञासूचा लोप झाला; इतकी आपल्या महाराष्ट्राची हानि झाली आहे. 'पंचवटीस्थलनिर्णयाचा' वाद उपस्थित करण्याचे मुख्य श्रेय श्रीमंत बापूसाहेबांकडे आहे, हे आतां आमच्या वाचकांस कांही नव्याने (सांगावयास नको. पण त्या वादाला काय चमत्कारिक वेळ लागली होती पहा! मूळ टीप देणारे काव्यसंग्रहाचे कर्ते रा. ओक ते श्रीमंतांचे प्रत्युत्तर ऐकण्यापूर्वीच परलोकवासी झाले! त्यांच्यामागून त्यांचेच | 'विद्यार्थित्व'नाते प्रतिपाल करणारे वि. विस्ताराचे लेखक पंडित, हेही आपले उत्तर पुरतें छापून निघण्यापूर्वीच कैलासवासी झाले! आणि आज तर मूळवाद उपस्थित करणारे श्रीमंतच इहलोक परित्याग करून गेले!! तेव्हां सारेच आटपलें असें मटले पाहिजे. श्रीमंत ज्या लेखाच्या शोधार्थ मुद्दाम तसदी घेऊन मुंबईच्या आमच्या ऑफिसांत आले होते, तो इच्छितलेखही त्यांच्या नजरेस ईश्वरानें । पडू दिला नाही, ह्याबद्दल आमांसही हळहळ वाटते. असो. आतां कितीही दुःख केलें तरी, उपाय ह्मणून नाहींच. श्रीमंत गेले ते