Jump to content

पान:केरळ कोकीळ.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १८९८. १४७ ह्यांच्या डोळ्यांवर जाळे पसरलेले असते, आणि ते डोळे येवढे मोठे असतात की, बहुतेक मस्तक त्यांनीच व्यापलेले असतें मटले तरी चालेल. कित्येकांच्या डोळ्यांचा रंग सुंदर हिरवा असतो. पण काही विवक्षित प्रकाशांत ते तांबडे लाल दिसतात ! बाजूस दिलेल्या आकृतींत डांसाचे मस्तक दाखविले आहे. त्यांत हत्तीच्या गंडस्थळाप्रमाणे जे दोन वाटोळे गोळे दिसतात, ते डोळे होत. दोहों बाजूंस दोन मिशा, व मध्ये त्याचा भाला किंवा बर्ची हे हत्यार दाखडांसाचे डोळे, मिशा आणि बी. विलें आहे. डांसाला आमचें चामडे फाडण्यासाठी परमेश्वरानें जो अवयव दिला आहे, त्यास आह्मीं भाला किंवा बर्ची असें नांव दिले खरे. पण तेंच कांही त्याचे प्रत्यक्षतः शस्त्र नव्हे. वरून दिसण्यांत मात्र तेंच शस्त्र असावे असे वाटते. पण खरा प्रकार अगदी निराळा आहे. हा सुईसारखा अवयव ह्मणजे, शस्त्रवैद्यापाशी जशी शस्त्र ठेवण्याची चामड्याची सुंदर पेटी असते, त्याप्रमाणे ह्या डांसमहाराजांची आयुध ठेवण्याची ती एक-कर्णाच्या जन्मकवचाप्रमाणे-स्वयंभू संदूक आहे. तिच्यावर मखमालीप्रमाणे बारीक केसांचे आच्छादन असते. ह्या पिशवीत त्याची निरनिराळ्या आकाराची पांच सहा शस्त्रे असून त्यांची टोंके पुढील अणकुचीजवळ एकत्र झालेली असतात; व सहापाती चाकूप्रमाणे ती त्यास पाहिजे तेव्हां पाहिजे तशी उघडतां येतात. किंवा ही त्याची संदूक झणजे एक न्हाव्याचीच धोकटी मटले तरी शोभेल. कारण हिच्या मध्ये वस्तरे, चिमटा, कात्री, नाचकण सर्व काही असते. येवढेच नव्हे, तर त्याहूनही अधिक हत्यारे असतात. त्याच्या इतक्या सर्व हत्यारांचा जुडगा ह्या चिमुकल्या ईश्वरनिर्मित पिशवीमध्ये राहिलेला असतो. हीच त्याची नांगी होय. दंश करतांना डांस हा, ही नांगी ३ आंत जाईल इतकी चामडीमध्ये खुपसतो. नंतर ती धनुष्याकार वळवून, तिच्या मुळांत असलेले दुसरे सुईसारखें