Jump to content

पान:कार्यसंस्कृती.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टूल किट आपण बऱ्याचदा टेबलावर काम करतो. आपलं कामाचं टेबल, त्यावरील वस्तू, जवळ असलेलं कपाट आणि हाताच्या अंतरावर असणाऱ्या इतर गोष्टी या सर्वांचा सम्यक विचार आपण करतो का? खरं म्हणजे टेबलावरची कामाची जागा म्हणजे एक प्रकारे विमानातलं कॉकपिट आहे. जसं वैमानिकाला सर्व बटणं, सर्व खटके हाताशीच लागतात, तसं टेबलवर काम करणाऱ्या माणसाला कामासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी हाताशीच असणं आवश्यक असतं. टेबलावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा सोक्षमोक्ष न उठता लावता यायला हवा. तसं करण्यासाठी प्रत्येकानं आपल्या कामाचं टूल किट किंवा हत्यारांची पेटी बनवायला हवी. सर्वसाधारणपणे टेबलवर काम करणाऱ्या माणसाची हत्यारपेटी अशी असायला हवी- इन ट्रे किंवा टेबलवर येणाऱ्या कोणत्याही कागदाला बसण्यासाठी जागा, काम चालू असलेली फाइल ठेवायचा ट्रे, काम झालं की बाहेर जाणाऱ्या कागदांसाठी आऊट ट्रे, कॉम्प्युटरं, घड्याळ, फोन किंवा आन्सरिंग मशीन, लिहायचे कागद, पेन, स्टेपलर, पोस्ट इट पॅड, पिना, फोनची डायरी, कॅलेंडर, प्लॅनर, व्हिजिटिंग कार्ड आणि छोटे निरोप लिहायचं रफ कागदाचं पॅड.. ही झाली माझी यादी. तुमचं 'टूल किट' कसं आहे बरं? ६५ कार्यसंस्कृती