Jump to content

पान:कार्यसंस्कृती.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वागतशील मन जेव्हा जेव्हा मी श्रेयाला फोन करायचो तेव्हा 'अर्जंट आहे का' असं घरचे विचारत. ओळीनं २-३ आठवडे फोन केल्यावर मी एक दिवस ठरवून श्रेयाला विचारलं, अर्जंट आहे हे ठरवणार कोण, मी की श्रेया ? श्रेयाकडे काम आहे म्हणूनच फोन केलेला असतो. त्यामुळे अर्जंट आहे का असा प्रश्न विचारून फोन न घेण्याचं स्वातंत्र्य हवंय किंवा काही वेगळं कारण? ऑफिसात बरोबर काम करत असताना कधी देवाणघेवाण गरजेची असते. कधी कानावर घालणं महत्त्वाचं असतं. तर कधी आपण करतोय ते ठीक आहे ना हे हवं असतं. तसं पाहिलं तर जीवन-मरणाचा प्रश्न हाच फक्त अर्जंट या प्रकारात मोडतो असं नाही. आम्ही तर एक लहानसं ऑफिस चालवत होतो. त्या वेळी श्रेया बरीच नवखी होती. त्यामुळे तिच्याकडून कोणताच फोन नाकारला जाणं, काम टाळलं जाणं योग्य नव्हतं. तिच्या शिकण्यात त्यामुळे निश्चितपणे कमतरता राहिली असती. श्रेयाला प्रत्यक्ष शिकवल्यावर तिच्या घरच्यांना तिथं ऑफिसात येणं, कामात झोकून देणं पसंत नसल्यानं 'अर्जंट आहे का' असं विचारून थोडे कामाबद्दलचा राग दर्शवत असत. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य, स्वतःला व्यक्त होण्यासाठी जागा, आणि काही करत राहण्यासाठी अवसर एवढीच तर गरज असते. कार्यसंस्कृतीच्या तत्त्वज्ञानात हा अवसर एकमेकांना देणं या गोष्टीला प्राधान्य द्यावं.. दारं मोकळी असावीत. खिडक्या असाव्यात आणि मन स्वागतशील असावं. १०५ कार्यसंस्कृती