Jump to content

पान:कविता गजाआडच्या.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोण वाजवी पैंजण ?

आज वारा चेतावला
जीव झाला जाईजुई
अंगभरून झुरते
देवघरात समई...

अस्सा वारा चेतावला
शिरिषाचे डोळे जड
पायतळी पानोपानी
आठवांचे फाटे शीड...

चेतावला वारा वारा
प्राणभरी काठोकाठ
फांदीफांदीला फुटवा
डोळा उघडतो देठ...

आज वारा चेतावला
नुरे पदराचे भान
दक्षिणेच्या दारातुन
कोण वाजवी पैंजण ?...?

कविता गजाआडच्या / ६४