Jump to content

पान:कबुतरखाना.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोंडी

भय
भरलेले
भवती

श्वास
मोकळा
नाही

पक्ष्यांच्या
गाण्यामध्ये
पिंजऱ्याची
ओवी येई

दाणा दाणा टिपताना
आवंढाच लावतो तोंडी
अन् तहानला पाणवठा
प्रतिबिंब जिवाचे कोंडी...

७२ / कबुतरखाना