या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कॅक्टस
दोस्त होऽऽ
काल त्यांनी माझ्या घराच्या विटा काढून
आपल्या घराभोवती कुंपणं बांधली
तेव्हा मला काही वाटलं नव्हतं...
पण...
आज त्यांनी माझा मेंदूच काढून घेतलाय कवटीसह
आणि लावले आहेत तिच्यात
कॅक्टस...
आपल्या बागेच्या शोभेसाठी
आता मला वाटतं...
सॉरी, आता मला काही वाटायचा
प्रश्नच उरलेला नाहीय.
■
कबुतरखाना/३