Jump to content

पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Rマ चालली असल्यानें, पोटापाण्याचा प्रश्न अति विकट होत चालला आहे. अशा स्थितींतू इंग्लंडच्या नमुन्या बरहुकूम आपणही प्रयत्नाः केले पाहिजेत. येवढी गोष्ट खरी कीं, कोणत्याही देशांत आरंभीं शूरपणा बराच होतेो. त्याप्रमाणें तो इंग्लंडमध्यें झालाही. असे स्वावलंबी प्रयत्न इंग्लंडमध्यें ज्या ज्या ठिकाणीं नव्यानें सुरू झाले त्या त्या ठिकांणीं कच्या अनुभवामुळे आरंभीं आरंभीं ठंचा या लागल्याच; लोकांनीं हातपायही गाळले. कारण हा प्रयत्न नवाच होता. लोकांच्या कसेोटीस अजून उतरावयाचा होता; याचमुळे प्रथम प्रथम थोडी फसगत झाली.