Jump to content

पान:ओळख (Olakh).pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समाधान नाही. सुशीलकुमारांनी प्रीतीच्या छापाने हा निर्णय ' मकर केला पाहिजे. आदिशक्तीच्या सिंहासनापुढे पुरुषार्थाचा निर्णय लागला पाहिजे असे श्रीकणाला वाटते. पौराणिक कथाभागातून खाडिलकरांनी रुक्मिणी आणि श्रीकण या दोन्ही व्यक्तिरेखा नव्याने निर्माण केलेल्या आहेत. मराठी नाटयसष्टीतील पौराणिक नाटकात नवनिर्मितीचा प्रश्न ज्यावेळी उपस्थित होईल त्यावेळी खाडिलकरांची रुक्मिणी आणि त्यांचा कृष्ण या दोन्ही पात्रांची महत्त्वपर्ण दखल घ्यावी लागेल. त्या दृष्टीने या कथानकात खाडिलकरांना नवे समर प्रसंग निर्माण करावे लागले. मळ कथानकातील रुक्मि विरुद्ध श्रीकृष्ण या संघर्षाला न सोडता त्याच्या पोटात आणि चपखलपणे त्या चौकटीत सामावून जाणारे नवनवे संघर्ष व ताण खाडिलकरांना नव्याने निर्माण करावे लागले. वा. लं. नी केलेले स्वयंवर नाटकाचे मूल्यमापन हे या कलाकृतीवर पुन्हा एक नवा प्रकाश टाकणारे विवेचन आहे.

 स्वयंवर' आणि 'मानापमान' या दोन नाटकांची वा. लं. नी केलेली फेरतपासणी व त्यांनी केलेली रसग्रहणे हा या पुस्तकाचा व एकूण खाडिलकर विवेचनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे असे माझे मत आहे. त्याबरोबरच ज्या ठिकाणी वा. लं. नी जुनी मते मधून मधून धक्का दिल्यासारखी कोलमडून टाकली आहेत. ती ठिकाणे पाहण्याजोगी आहेत. सामान्यत्वे विद्याहरण नाटकाचा जयघोष करण्याकडे सर्वांची प्रवृत्ती आहे. काहीजण तर हे नाटक खाडिलकरांच्या नाटयसृष्टीतील सर्वश्रेष्ठ नाटक आहे असेही मानताना आढळतात. एक टीकाकार म्हणतो खोचदार ध्वनिपूर्ण असा विनोद खाडिलकरांच्या 'मानापमान' व 'विद्याहरण' या दोन नाटकांतून काय तो आढळतो. 'कीचक वध' या नाटकातील स्वारस्य समकालीन परिस्थितीचा विसर पडल्यानंतर कमी होणारे आहे. विद्याहरणा'चे तसे नाही. काही जण मद्यपान विरोधी नाटक म्हणून ' एकच प्याल्या ' पेक्षाही, · विद्याहरण' च कसे प्रभावी आहे हा मद्दाही तपशिलाने मांडतात. वा. लं. नो विद्याहरण हे नाटक संपूर्णपणे अपशस्वी ठरविलेले आहे. त्यांचे म्हणणे असे की जोपर्यंत शक्राचार्यांच्या भमिकेला तात्त्विक अधिष्ठान प्राप्त होत नाही, जोपर्यंत त्याच्या संप्रदायाचा दर्जा आपणासमोर येत नाही. तो पर्यंत शुक्राचार्यांच्याविषयी आदरयुक्त प्रेम वाटणे संभवनीय नाही. आणि म्हणून त्याचे पतन शोकात्मही वाटणे शक्य नाही. एक श्रेष्ठ दर्जाचे विचारनाटय खाडिलकरांना या नाटकात निर्माण करता आले असते. पण ती संधी त्यांनी गमावलेली आहे. या नाटकातील विनोद निर्माण करणारी सर्व प्रभावळ शुक्राचार्याच्या जीवनाची शोकात्मिका डागाळन टाकते, त्याचे व्यक्तिमत्व साकार होत . नाही. आणि या नाटकात देवयानीच्या दारुण प्रेमभंगाची हकीगत चटावरचे श्राद्ध

१२१

ओळख