पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुरुष कामगारासाठी- तो स्वत:, त्याची बायको, त्याची मुलं लग्न झालं असो/ नसो, त्याच्यावर अवलंबून असलेले त्याचे पालक (व अवलंबून असलेले त्याच्या बायकोचे पालक, विधवा) व त्याच्या वारलेल्या मुलाची मुलं (जर असतील तर). स्त्रीकामगारासाठी- ती स्वतः, तिचा नवरा, तिची मुलं लग्न झालं असो/नसो, तिच्यावर अवलंबून असलेले तिचे पालक, व तिच्यावर अवलंबून असलेले तिच्या नवऱ्याचे पालक आणि तिच्या वारलेल्या मुलाची विधवा आणि त्या विधवेची मुलं. समलिंगी जोडप्यातला एक जण दुसऱ्यावर अवलंबून आहे (डिपेंडंट) असं दाखवता येत नाही. उदा. द प्रॉव्हिडंट फंड अॅक्ट, १९२५. या अॅक्टमध्ये अवलंबून असलेली व्यक्तीच्या (डिपेंडंट) व्याख्येत समलिंगी जोडीदार बसत नाही. अवलंबन (डिपेंडंट) ची व्याख्या - [45] प्रॉव्हिडंट फंडाच्या योजनेत सहभागी असलेल्या व्यक्तीचे खालील नातेवाईक अवलंबनच्या व्याख्येत बसतात - बायको, नवरा, पालक, मुल, धाकटा भाऊ, लग्न न झालेली बहीण, वारलेल्या मुलाची बायको व तिचं मूल आणि ज्या ठिकाणी कोणताही पालक जिवंत नाही त्या ठिकाणी वडिलांच्या बाजूचे आजी/आजोबा. या वरील गोष्टींमुळे लग्न झालेल्या भिन्नलिंगी जोडप्यांना ग्रॅच्युइटी, पी.पी.एफ., जीवनविमा, वैद्यकीय विमा इत्यादी सुविधांचा जो आधार असतो तो समलिंगी जोडप्यांना मिळत नाही. नामांकन नामांकन याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मरणोत्तर त्याची संपत्ती (किंवा इतर गोष्टी) ज्याचं नामांकन आहे त्यानं जो कायदेशीर वारसदार आहे त्याच्यापर्यंत ही अमानत पोहोचवण्याचं कार्य बजावणं. Nominee acts as an agent for the legal heirs of the deceased person. नामांकन करणं म्हणजे वारसा हक्क नाही. म्हणून समलिंगी जोडीदाराचं नामांकनात नाव घालणं म्हणजे त्याला वारसा हक्क देणं नाही. डिप्लोमॅट प्रत्येक देशात समलिंगी नात्यांसाठी वेगवेगळे कायदे आहेत. त्यामुळेही काही प्रश्न उपस्थित होतात. उदा. काही देशात समलिंगी जोडप्यांना लग्न करता येतं. अशा देशाचा डिप्लोमॅट समलिंगी असेल आणि त्याला भारतात पोस्टिंग मिळालं तर त्याच्या जोडीदाराला भारतात डिप्लोमॅटिक स्टेटस मिळत नाही, कारण त्यांच्या नात्याला या देशात मान्यता नाही. [46] , इंद्रधनु ... ४८