पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
  • समलिंगी व्यक्तीला / समलिंगी जोडप्यांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार

मिळावा. हे अधिकार मिळवण्यासाठी अनेक वर्षं समलिंगी समाजाला आणि भिन्नलिंगी समाजातील उदारमतवादी व्यक्तींना झटावं लागणार आहे. यासाठी प्रत्येक समलिंगी व्यक्तीनी 'आऊट' होणं गरजेचं आहे. आपलं माणूसपण जोवर लोकांच्या समोर येत नाही तोवर ते आपल्याला माणूस म्हणून स्वीकारणार नाहीत. आपल्या आयुष्यात जरी आपल्या वाट्याला हे अधिकार मिळाले नाहीत तरी आपल्या कामाचा भावी पिढीला नक्कीच फायदा होईल. आपल्या वाट्याला जे अन्याय आले ते त्यांच्या वाट्याला येणार नाहीत (किंवा त्या अन्यायांचं प्रमाण कमी होईल) आणि ते आपल्यापेक्षा जास्त सुखाचं, समृद्धीचं, परिपूर्ण आयुष्य जगू शकतील. म्हणून आता आपण त्यांच्यासाठी काबाडकष्ट केले पाहिजेत. आपण हे पुढच्या पिढीचं देणं लागतो. 4 0 इंद्रधनु... . ११८