पान:इंदिरा.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ दुर्दैवें पति मरण पावतां छिन्नभिन्न करिती, इतुकें करुनी तृप्ति होइना ! कोंडुनि ठेवीती, हालीं जाचीं कितीक मरती; अनाथ ज्या जगतीं, सांगुं कशाला दुःसह त्यांची होई काय गती ॥ १ ॥ स्त्रीजातीला पुरुष । १०८ श्लोक. आले हे नटुनी इथे बुडविण्या माझी कृती कृत्रिमें; ऐसे हो असती नितांत कपटी दुष्कर्म, मातें गमे; जी मी हे अति दिव्य वाघ शमवीं, द्वारीं स्वयें पाळुनी, ती का मी फसणार बाळमतिला ऐशां तिघां देखुनी? १०९ वाघां जिंकियलें, तयां करियलें संपूर्ण आज्ञांकित; जिंकाया पुरुषां असे कठिण का, अज्ञान जे भासत ? स्त्रीवस्त्र परिधान ते करुनियां आले तिघे मंदिरा; झाला हेतु न पूर्ण; का रिति अशा हे जिंकिते इंदिरा ? ११० दिंडी. करी बंधो तूं पारिपत्य त्यांचें, कार्य साधीं रे पीडिल्या स्त्रियांचें; कींव कोणा ये ? स्त्रियां कोण त्राता ? एक देवी की वीरभद्र भ्राता ! १११ श्लोक. स्त्रियांची शोकार्ह स्थिति बघुनियां मीं उभविलें अशा ग्रामा येथें, तयिं किं निपजावें फळ भलें; परी येथें आला सकळ कृति विध्वंस करण्या; इथे येवोनी तो नृपसुत मला याचि वरण्या ! ११२