पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(४) लघिमा (६) प्राकाम्य (७) ईशित्व (८) वशित्व ह्या आठ महासिद्धींचा प्रादुर्भाव होतो.
 (१) योग्याचे शरीर केवढेही असले तरी इच्छेनुसार शरीराचा संकोच करून ते सर्व मूर्त वस्तूत अत्यंत लहान करता येते. आपण 'स्टार वॉर्स' सारख्या विज्ञानाधिष्ठित काल्पनिक कथांत त्या यानातील माणूस नाहीसा होऊन अणुरूपात जातो व नंतर पाहिजे तेथे मूळ स्वरूपात प्रगट होतो, हे पाहिले आहे. त्या विज्ञानकथेप्रमाणेच ही सिद्धी पतंजलींनी अडीच हजार वर्षांपूर्वी सांगितलेली आहे. ही सिद्धी म्हणजेच अणिमा.
 (२) अणिमाच्या विरुद्ध आपले शरीर पाहिजे तेवढे मोठे करता येणे ही 'महिमा' सिद्धी होय.
 (३) आपल्याला पाहिजे तेवढे आपले शरीर अगदी एखाद्या पर्वताएवढे सुद्धा जड करता येणे ही 'गरिमा' सिद्धी.
 (४) याउलट आपले शरीर कापसासारखे हलके करणे ही 'लघिमा' सिद्धी.
 (५) बसल्या जागेवरून चंद्रबिंबासारख्या अतिदूरवर्ती वस्तूला बोटाने स्पर्श करण्याची ही प्राप्ती' नावाची सिद्धी होय.
 (६) ज्या कशाची इच्छा करावी ती गोष्ट घडून यावी असे सामर्थ्य अंगी उत्पन्न होणे ही 'प्राकाम्य' सिद्धी.
 (७) सर्व सृष्ट्य वस्तूंवर सत्ता चालवणे याला 'ईशित्व' सिद्धी म्हणावयाचे.
 (८) योग्याच्या इच्छेने अतिक्रमण न करता सर्व भूते वश होऊन राहणे ही 'वशित्व' नावाची सिद्धी.

 या सिद्धी ध्यानधारणेतून येत नाहीत. त्यासाठी 'संयमा'ची जरुरी असते. संयम म्हणजे धारणा, ध्यान व समाधी हे त्रय एकत्र प्रवृत्त झाले म्हणजे तो 'संयम' होतो. समष्टिसंयमाने योगी कसलाही अडथळा न येता पर्वतादिकात प्रवेश करू शकतो, पाणी त्याला भिजवू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, वादळ त्याला केसभरही हलवू शकत नाही, आकाशात तो सहज वावरू शकतो तरीही

२६२