पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(४) चढत्या भाजणीची उपाययोजना (Process Imagery) :
 या पद्धतीमध्ये आपले जे ईप्सित आहे त्याची पायरी पायरीने आपण मार्गक्रमणा करत आहोत, अशी ही संकल्पना आहे. शारीरिक विकारमुक्तीसाठी आपली संरक्षणक्षमता कसे कार्य करते, उपचार कितपत यशस्वी होत आहेत हे कल्पनाचित्र- निर्मिती ही त्यात असते. येथे महत्त्वाची गोष्ट विकाराचे बरे होणे - विकारमुक्तता • ज्या पायरी पायरीने होत जाते त्याच सम प्रमाणात ही उपाययोजना करावी लागते.
(५) अंतिम स्थिती प्रतिमा :
 ह्या पद्धतीत रोग पूर्ण बरा झाल्याची प्रतिमा डोळ्यांसमोर आणावयाची असते. उदाहणार्थ अपघातात पाय मोडला आहे. तो पूर्ण बरा झाला आहे, तुम्ही जॉगिंग करू शकत आहात, टेकडी, जिने सहज चढू शकत आहात अशा प्रतिमा निर्माण करावयाच्या. तुमच्या पोटात अल्सर झाला होता, तो पूर्ण बरा झाला आहे, पोटात दुखणे पूर्ण बरे झाले आहे, मळाच्या तपासणीत अदृश्य रक्त (Occult Blood) पूर्वी येत असे ते पूर्ण थांबले आहे व तुमची परीक्षा नकारी आली आहे वगैरे. पण या प्रतिमा निर्माण करताना प्रथम चढत्या भाजणीने रोग बरा होत असल्याची उपाययोजना आधी करावी लागते. या पायऱ्या चुकवल्यास त्याचा काहीही उपयोग होणार नाही.
(६) सर्वसामान्य रोगमुक्ती प्रतिमा :
 या प्रतिमा म्हणजे वर वर्णन केलेल्या सर्व प्रकारांत येत नसलेला प्रकार. यात अध्यात्माचा उपयोग केला जातो. आपल्या धर्मानुसार पवित्र, आदरणीय गोष्टी प्रतीकरूपाने वापरावयाच्या. अवकाशातून एक अनाकलनीय प्रकाशझोत येत आहे. हा अनुभव रेकीचे जनक उसूई यांना आला होता. अनेक संतांनाही आला होता. तसेच ईश्वर आशीर्वादात्मक हात उंचावून प्रसन्न चेहऱ्याने कल्याण प्रदान करतो आहे, हे प्रकार आपलेकडे अनेकांनी अनुभवले आहेत. श्री. श्रीपादराव जोशी यांच्या पत्नी पाच शस्त्रक्रियांनंतर, अशक्य वाटत असताना पूर्ण बऱ्या झाल्या. त्या वेळी श्रीराम त्यांना आशीर्वाद देत आहे अशी प्रतिमा त्यांच्या डोळ्यांसमोर होती. हीच

२३९