Jump to content

पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणे. बरोबर होणार नाही.जसे पदार्थविज्ञानशास्त्रात एकेकाळी अणू हे पदार्थाचे मूळ स्वरूप समजले जाई व ते पुढे बदलून संशोधनातून अणू हाही काही घटकांचा बनला आहे व वैज्ञानिक त्याचे विभाजन करून 'क्वार्क' या घटकापर्यंत पोहोचले आहेत.तसेच पेशी हा शरीराचा अणू.त्याची रचनाही आज बरीचशी ज्ञात आहे.पण जीन्सच्याही पलीकडे काही आहे का? काही असावे यात शंकाच नाही.कारण विज्ञानगंगेत रोज काही नवीन ज्ञान मिळतच असते, नवीन शोध लागतच असतात.मग त्या प्रत्येक मानवी घटकाचे अंतिम सोडा परंतु आजचेही मूल्यमापन करून त्यावर आपल्या संकल्पना बसविणे योग्य होणार नाही.पेशीतील डी.एन्.ए. हासुद्धा काही रासायनिक मिश्रणापासून तयार झालेल्या दोन धाग्यांच्या एकमेकांभोवती विळख्यामुळे तयार होणारा घटक आहे का?आज घटकेला तरी अशा एकमेव धाग्याला त्यात अस्तित्व नाही.निसर्गामध्ये अशा अत्यंत स्वतंत्र, इतरांशी काहीही संबंध नसलेला कोठल्याही घटकाचा नमुनासुद्धा सापडत नाही.मग हे कसे अशक्य आहे हे सिद्ध करण्याची सुद्धा जरुरी नाही.पेशी,पेशीचे घटक अशा सर्व गोष्टी दृढ सामाजिक बंधनाने जोडलेल्या आहेत.त्यांचा वेगवेगळा विचार हेच अनैसर्गिक आहे.तेव्हा 'जीन्सचे' स्वतःचे जे काही एक विश्व आहे.त्याचे तुटक स्वतंत्र मूल्यमापन करणे बरोबर होणार नाही.या जीन्सच्या विश्वात निरनिराळे प्राणी आणि मानव यांची स्वसंरक्षण यंत्रणा,अस्तित्वाचे सातत्य या गोष्टी अनुस्यूत आहेत.प्राण्यांच्या या निरनिराळ्या जाती म्हणजे त्यांच्या पूर्वजांचे प्रतिबिंब.त्यांच्या भावभावना,संरक्षण यंत्रणा यांत्रिक दृष्ट्या एकाच छापाची असते.फरक असतो तो प्रसंगानुसार ताणतणावामुळे बदलणाऱ्या मानसिकतेचा.देह-मन-संबंध अतूट आहे हेच वैश्विक सत्य आहे.आज जीन्सचा आराखडा तयार झाला आहे.पण हे अंतिम असेलच असे नाही.आपण वाट पाहू.
 मानवाच्या आरोग्याचे जे अनेक पैलू आहेत त्यांपैकी सामाजिक आपलेपणा व सामाजिक बंधने यांचा निश्चितपणे मोठा वाटा आहे.याचा संबंध मूलभूतपणे आपल्या पुनर्निर्मितीच्या कार्यात दडला आहे. स्त्री-पुरुषसंबंधातून अपत्याची निर्मिती होते व ते प्रत्येक अपत्य काही जीन्स घेऊन जन्मास येत असते.या पुनर्निर्मितीच्या कार्यात कधीही एका अपत्यासारखे दुसरे अपत्य नसते. प्रत्येक अपत्य जन्मतःच स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घेऊन जन्मास येत असते.याला काहीसा अपवाद जुळ्यांचा
१५६