पान:आरोग्यशास्त्र.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हवामान आणि हवामापन ९१- उष्ण कटिबंधांत झाडांपासून गारवा येतो. कारण पानांपासून बाष्पो - गमन होत असतें. वृक्षांपासून उन्हास प्रतिबंध होतो. त्याचप्रमाणें शीत कटिबंधांत गारठ्याचा प्रतिबंध झाल्यानें व उष्ण कटिबंधांत उन्हाचा प्रतिरोध झाल्यानें व बाष्पोद्गमनाने झाडांचा उपयोग होतो. झाडांचें उष्णतामान पृथ्वीपेक्षां कमी असल्यानें हवेंतील वाफ शोषली जाते व ती अधिक थंड झाल्यानें जलरूप होऊन पर्जन्य होतो. ह्या- प्रमाणें झाडी असलेल्या प्रदेशांत वृष्टि अधिक होते. निवृक्ष व ओसाड प्रदेशांत त्याचे उलट स्थिति असते. हवामान - मापन ( मीटिअ रॉलॉजी ) पर्जन्य, उष्णतामान व वातप्रवाह ह्यांसंबंधी वातावरणांत होणाऱ्या भिन्न ( Phenomena ) स्थितींचें विवेचन ज्या शास्त्रांत असतें त्यास हवामान - मापन ( Meteorology ) ह्मणतात. दिलेल्या किंवा सांगितलेल्या काळीं वातावरणाची जी सामान्य स्थिती असते तिला हवा म्हणतात. हा शब्द पृथ्वीच्या अगदीं लगतच्या व थोड्या उंचीच्या वातावरणाच्या स्थितीला लावतात. एकाच आका- राच्या व एकाच स्थितींत ठेवलेल्या यंत्राच्या सहाय्यानें, हिंदुस्थानांत `व सर्व सुधारलेल्या देशांत Meteorology संबंधीं बारकाईचें व पद्धत - शीर निरीक्षण अनेक ठिकाणीं करतातः- - पद्धतशीर नोंद करण्यास अवश्य अशा हवामानाच्या (phenomena). मुख्य बाबी खाली दिल्या आहेत. १. वातावरणाचें उष्णतामान - हें उष्णतामापकानें घेतात. २. हवेचा दाब . हा वातमापकानें मोजतात. ३. पवनाची दिशा - पवनाची दिशा, हवेचा वेग व वातावरणाचा दाब हीं अनेमोमीटरने समजतात.