पान:आरोग्यशास्त्र.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वातावरण व वाताभिसरण ६५ खिडक्या मोठ्या ठेवाव्या. ह्याप्रमाणें दर माणशी २४ स्केअर इंच मानाचा खिडकीचा व्यास असावा. महाराष्ट्रांत अधिक वेळां हवा पाल- तां येईल म्हणून दर माणशी घराची जागा कमी पुरेल व खिडक्या लहान ठेवितां येतील. दरमाणशी ठेवावयाचे जागेची किमान मर्यादा ( क्यूबिक फूट ). निरनिराळ्या स्थळी दरमाणश किती जागा ठेविली पाहिजे ह्याबद्दल नियम. १. खाजगी घरांतील निजण्याची खोली २. कापडाखेरीज इतर कारखाने ३. घराचे पिछाडीचा तळमजला ४. घराचे पिछाडीचा दुसरा मजला ५. शिपायांच्या बराकी ६. सार्वजनिक प्राथमिक शाळा ७. लंडन कौंटी कौन्सिलच्या शाळा ८. कालव्यांतील बोटी ९. आगबोटीवरील खलाशांच्या खोल्या १०. गायांचे गोठे ३०० ४०० ५०० ४०० 900 ६०० ८०० ... १३०० ६०८ १२० ... ८०० निरनिराळ्या घनत्वाचे वायु व वायुरूप पदार्थ एकमेकांमध्ये मिसळ- तात म्हणून हवेची शुद्धि निसर्गत: होते. कारण उच्छ्रासानें उत्पन्न होणारे वायु खोलींत असणाऱ्या हवेत मिसळतात व ते एकेच जागी साचून राहात नाहीत. हवेंतील दोष मंद होतात, परंतु हवेंत येणाऱ्या घन पदार्थांचें वरच्याप्रमाणें दूरीकरण होत नाहीं, तर ते खोलीच्या तळाशी बसतात. ज्या दिशेनें वारा येत असेल त्या बाजूच्या खिडक्या उघडाव्या. खिडक्या, दरवाजे समोरासमोर असल्यानें वाऱ्याचा प्रवाह अधिक वेगानें चालतो. प्रवात करण्याचें काम नुसत्या निसर्गतः येणाऱ्या वाऱ्यावर