पान:आरोग्यशास्त्र.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८ आरोग्यशास्त्र होतो. मृत जनावरांत पेंढा भरून विकणारे, सोमलाचे रंग, नसें एमे- रल्ड ग्रीन व त्या रंगापासून इतर वस्तू करणारे, फळाची व बटाट्याची कीड नाहीशी करण्यासाठीं सोमलाचे औषध करणारे व तें वापरणारे अशा लोकांना ह्याचा विषार बाधतो. भावनाः- अग्निमांद्य, मळमळ, वांती, ढाळ, पोटदुखी, डोळेसुज, डोळे व नाक गळणे, डोकें दुखणें, हाताच्या बोटांना मुंग्या येणें व त्यांची बधिरता, पायांत पेटके येणे, टक्कल पडणें, अचके येणें व पक्षघात. क्रोमिअमचा विषार - क्रोमिअमचे रंग करणाऱ्यांना व वापरणाऱ्यांना ह्याचा विषार जडतो. भावनाः लाळ येणें, शिंका येणें, डोळे व नाकाची आग, व्रण व कातड्यावर नायट्यासारखे पुरळ. सल्फ्यूरस अॅसिड - सल्फ्युरिक अॅसिड, तुरटी, कांच, कल्हई करणें, ब्लीचिंग ( रंगहीन करणें ) तयार करणे, दगडी कोळसा जाळणे इत्यादि क्रियांमध्यें सल्फ्यूरस अॅसिड उत्पन्न होतें व त्यामुळे शरीरास अपाय घडतो. भावनाः— मलावरोध, ओठ, चामडी व तोंड काळे पडणें, दुखणे, गिळतांना अडचण, उचकी व अतितृषा. घसा क्लोरिन - (ब्लीचिंग ), रंगहीन करणें व रंग देणें असल्या कामी कोरिनची उत्पत्ति होऊन विषसंचार होतो. भावना :- खोकला, छातीत दुखणे, डोळसूज व गुदमरणें. कॅनिक अॅसिड वायू-चुनखडी भाजण्याचे जागीं व सोडावॉटर इत्यादि वायुयुक्त पेयें करण्याचे कारखान्यांत हा असतो. भावना - अशक्तता, अग्निमांद्य, घेरी, मज्जेसंबंधों विकृती या भावना होतात. तो फार असला तर कष्टश्वास, स्नायूंची निर्बलता व बेशुद्ध