पान:आरोग्यशास्त्र.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ आरोग्यशास्त्र सांठवलाच तर, तो लांब परड्यांत सांठवावा. तो कोरडा राहावा म्हणून त्यावर छाया असावी. तो तेथून महिना पंधरा दिवसांनी हलवीत जावा. खेड्यांत तो गांवाचे बाहेर सांठवावा. उकिरडा नेण्याचें काम पहाटे करावें. म्हणजे लोकांना त्याच्या दुर्गंधीचा त्रास होणार नाहीं. आपले घरांतील केरकचरा शेजारचे दरवाज्यासमोर फक्त हिंदुस्थानांतच टाकण्यांत येतो. सांठविलेल्या व गोळा केलेल्या केरकचऱ्याची वाट तीन प्रकारांनी लावितात - [अ] खत. [ आ ] जमीनींत भर घालणें. [इ] जाळणें. (अ) शेण व राख निराळीं सांठविल्यास त्यांचा उपयोग खताकडे होतो. खतास थोडीबहुत किंमत येते. हे पदार्थ शेतकरी विकत घेऊन आपल्याकडे नेतात. ( आ ) सखल जागा भरून काढण्यांत माती, कंकर व इतर कचरा यांचा उपयोग करितात. (इ) ज्वलन - शहरांतील कचरा डिस्ट्रक्टर-भट्टींत जाळून टाकावा. बाजारांतील दुर्गंधी पदार्थ - मृत जनावरांचे सांगाडे - ह्या रीतीनें जाळावे. चांगले बांधकाम असलेल्या भट्टींत कचऱ्यांतील कोळसा इत्यादि जिनसां- मुळे वरील पदार्थांचें पुरतें दहन होतें. जळून उरलेल्या कंकर वगैरेला अल्प किंमत येते. जमीनीच्या काँक्रोर विटांमध्यें तें घालतात. भट्टींत निपजणाऱ्या उष्णतेपासून वाफेची उत्पत्ति करून पाणी ओढणें, चुन्याच्या घाण्या चालविणें ह्रीं कामें करून घेतां येतील. केरकचऱ्यानें दगडी कोळशाचे रे उष्णता उत्पन्न होते. कॉन्सर्व्हन्सी सिस्टिमः --- मलमूत्रादि उत्सर्जित पदार्थांत कुजण्याची क्रिया होण्यापूर्वी व होईल तितकें लवकर गांवाबाहेर नेणें हा कॉन्सर्व्हन्सी सिस्टिमचा उद्देश असतो.