Jump to content

पान:आरोग्यशास्त्र.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाणी अग्निमांद्य व अतिसार २५ ८ किंवा ९ अंशांपेक्षां जलांत अधिक काठिण्य असल्यास त्यापासून अग्निमांद्याची किंवा अतिसाराची चिन्हें होतात. विशेषतः अनभ्यस्त मनुष्यास ह्यापासून फार बाधा होते. समुद्रकिनाऱ्याजवळील खाऱ्या विहिरीपासून ह्या भावना विशेषतः होतात. मॅग्नेशियमचें, कॅलशियमचें व सोडियमचें सल्फेट आणि क्लोरैड ऑफ मॅग्नेशियम् हें अधिक अपाय- कारक आहेत. मृत्तिका, खनिज द्रव्यें व उद्भिज द्रव्यांचे कण किंवा गाळानें देखील अतिसार होतो. अशाश्वत कठिण जल इतकें अपायकारकं नसतें. मैलापाण्याचे संपर्कानें, दुषित झालेल्या जलाच्या प्राशनानें कधीं कधा विषूचिकासदृश अतिसार, वांत्या व पेटके येतात. ह्या भावना देखील तसल्या पाण्याचा अभ्यास नसलेल्या माणसांत मुख्यतः होतात; विशेषतः उन्हाळ्यांत किंवा कांहीं अंशीं अन्य ऋतूंत जेव्हां एकाएकीं किंचित् काळपर्यंत पाणी बिघडतें, त्यावेळीं वरील प्रकारचा अतिसार सुरू होतो. दगडी कोळशासारख्या उद्भिज पदार्थांपासून बहुधा अपाय घडत नाहीं. परंतु ह्या द्रव्यांचे प्रमाण अधिक असल्यास व तीं कुजत असली तर कांहीं अपाय घडणें शक्य आहे. शीतकटिबंधामध्ये उन्हाळ्यांत तान्ह्या मुलांना अतिसार होतो. त्या. पैकी कित्येकांना तो अशुद्ध जलापासून होतो. ह्याच कारणानें उष्ण किंवा समशीतोष्ण कटिबंधांत आमांश होतो. आमांशाचे मलाचा संपर्क पिण्याचे पाण्यांस झाल्यास त्या रोगाची बाधा पुष्कळ रोग्यांना होते. टैफाइड ज्वर बहुधा जलाचे द्वारा पसरतो. एकाद्या रोग्याचे विष्ठेच्या अंशापासून मोठा जलाशय देखील बिघडून जाईल. आशिया खंडांत होणारी विषूचिका हा विशिष्ट प्रकारचा आजार एकाद्या तसल्या आजाऱ्याचे विष्ठेत असलेल्या विशेष प्रकारच्या जंतूं -