पान:आरोग्यशास्त्र.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाणी 11 २३ सूक्ष्म जंतूंना पोषक आहे. म्हणून ह्या दृष्टीनें प्राणिज कोळसा अपाय- कारक आहे. कोळशापासून प्रत्यक्ष रोगजंतूंवर केव्हांही कार्य घडत नाहीं. म्हणून जंतुनाशनावांचून अन्य कारणासाठीं व पाण्यांतील शिसें दूर करण्यासाठी कोळशाचा उपयोग चांगला होतो. परंतु, त्याची निगा घेतली पाहिजे. SUE 103 75 (२) बिस्कॉफच्या स्पंजी आयर्न फिल्टरमधील द्रव्य फार दिवस टिकाऊ असून त्यापासून जलांतील खनिज व प्राणिज पदार्थ दूर होतात. फिल्ट- रांत बुडाशीं अस्बेस्टासचा पत्रा ठेवावा; त्यावर वाळूचा थर, त्याचेवर पैशेल्यू सैटचा - 'अशोधित ऑक्सैड ऑफ मँगॅनीज' चा थर, त्याचेवर स्पंजी आयर्न व त्याचेवर सुती कापड ठेवावें. सुती कापड वरचेवर धुतलें पाहिजे व कांहीं काळानंतर पालटलें पाहिजे. पैशेल्यूसैट ऑक्सिडेशन करतें व लोहाचे खालील सर्व थरांमुळे इतर गाळ व लोहकण यांस खाली पाण्याला वाव मिळत नाहीं. वरील शोधकांचा उपयोग अन्य कामी झाला तरी रोगजनक कृमींचा नाश त्यांचेपासून होत नाहीं. उलट शोधकांतील रंध्रांत जंतु अडकून राहिल्यामुळे त्या स्थळी त्यांची खूप वाढ होण्यास वेळ सांपडतो व एकाद्या सांथीचे वेळीं इतर सामान्य उदकापेक्षां ह्याचें जल अधिक अपायकारक असण्याचा संभव आहे, असें शोधाअंती आढळून येतें. (३) पॅस्टॉर चेंबरलंड फिल्टरमध्ये बुडाकडून दाबाच्या जोरानें पाणी. आंत ढकललें जातें व तें वरून बाहेर पडतें. ह्या शोधकाचें द्रव्य विशेष प्रकारच्या छिद्रयुक्त चिनी मातीचें केलेलें असतें. त्यामुळे कुजण्याची वगैरे भीति ह्याला नसते. तरी पण चिनीमातीचा मेणबत्तीच्या आकाराचा रूळ वरचेवर ब्रशानें घांसून धुतला पाहिजे. ह्या फिल्टरला आरपार छिद्र पडलें तर, अशुद्ध पाणी एकदम बिनहरकत फिल्टरच्या बाहेर जसेंच्या. तसेंच जाईल. वाळू किंवा कोळशाचे फिल्टरांत एकादा पदार्थ कमी