पान:आरोग्यशास्त्र.pdf/३०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३०० आरोग्यशास्त्र बैठकीत आरोग्यनाशक स्थिति असल्याची खात्री झाल्यास घराच्या मालकास अगर त्यांतील बिन्हाडकरूंस ठरलेल्या मुदतींत ती स्थिति दूर करण्याची नोटीस देण्यांत येते. त्या मुदतीत ती दूर न झाल्यास पुढें लगेंच होणाऱ्या बैठकीत सॅनिटरी इन्स्पेक्टर याबाबत रिपोर्ट करतो व त्याला, झटपट अधिकार ( समरी पॉवर ) असणाऱ्या -मॅजिस्ट्रेटपुढें फिर्याद करण्याची परवानगी मिळते. ही फिर्याद गुन्हा घडलेल्या तारखेपासून सहा महिन्यांच्या अंत करावी लागते. फिर्यादी- नंतर मॅजिस्ट्रेट प्रतिवादीला समन्स काढतो. चौकशीच्या दिवशीं इन्स्पे- क्टरने अपराधाबद्दल पुरावा, गुन्हेगारास दिलेली कायदेशीर नोटीस व प्रतिवादी घराचा मालक अथवा विन्हाडकरू असल्याचा पुरावा हजर केला पाहिजे. चौकशीअंती गुन्हा शाबीत झाल्यास मॅजिस्ट्रेट आरोपीला ठराविक मुदतींत आरोग्यनाशक स्थिति दूर करण्यास व तशी पुन्हां न करण्यास ताकीद देणें किंवा ताकीद देऊन शिवाय दंड करणें व तें 'घर राहण्याच्या लागी नसल्यास तें खाली करण्याचा हुकूम करणें अशा पैकीं एखादा हुकूम फर्मावतो. खाजगी घरांतील आरोग्यनाशक स्थिती दूर करण्यासाठी झालेला सर्व खर्च भरून घेण्याचा अधिकार स्थानिक सरकारास आहे. वरील हुकुमाची अंमलबजावणी झाली किंवा नाहीं हें सॅनिटरी इन्स्पेक्टरनें पहावें. बजावणी न झाल्यास पुन्हा फिर्याद करावी. दुसऱ्या चौकशीवरून आरोपीची ढिलाई दिसल्या ती स्थिति करी- पर्यंत दर दिवसास दंड करण्यांत येतो. मॅजिस्ट्रेटचे निकालावर चौदा दिवसांच्या आंत अपील करण्याचा अधिकार आरोपीस असतो. परंतु त्यानें त्या बाबतीत स्थानिक सरकारास योग्य वेळीं आगाऊ नोटीस . दिली पाहिजे. म्युनिसिपल व सॅनिटरी कमिटी ( स्थानिक सरकार ) यांच्यावर 'आपपल्या हद्दींतील लोकांना पुरेसें व स्वच्छ पाणी पुरविण्याची जबाबदारी