पान:आरोग्यशास्त्र.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९२ आरोग्यशास्त्र पोहोंचतें व उपाय होतात म्हणून अशिक्षित लोकांपेक्षां व देशांपेक्षा सुशिक्षित लोकांत व देशांत हें प्रमाण कमी असतें. धंद्याचा परिणाम आयुष्यावर पुष्कळ होतो. उघड्या हवेवर मेहनतीचें काम करणारे लोक पुष्कळ वर्षेपर्यंत वाचतात व त्यांची शरीरप्रकृतो निकोप असते. बैठीं कामें करणारे लोक अशक्त असतात. त्यांच्यामध्ये मृत्यूचें प्रमाण अधिक असतें. बंद, दमट, किंवा उष्णता असलेल्या जागेत काम करणाऱ्या लोकांमध्यें तें फारच असतें. ज्या धंद्यांत घन जातीचे परके पदार्थ, जसें कापूस, दगड, धातु, लांकूड, पीठ इत्यादिकांचे कण फुप्फुसांत जातात त्या धंद्यांतील लोकांमध्यें मृत्युसंख्येचे प्रमाण अत्यंत असतें. " अवशिष्ट आयुष्य " (एक्स्पेक्टेशन् ऑफ लाइफ ) खानेसुमारीवरून मनुष्याच्या जीवित्वाचें सरासरी आयुष्य काढतां "येते. त्याचप्रमाणे कोणत्या वयाचा मनुष्य आणखी किती वर्षे जगेल त्याचें प्रमाण ठरवितां येईल. सुधारणेमुळें युरोपखंडांत आयुष्याची सरासरी ज्यास्त होत चालली आहे. पुढच्या आयुष्याची सरासरी काढावयाची असल्यास ८० या संख्येतून वयाची संख्या वजा करावी आणि बाकी राहील त्याचे दोन तृतीयांश करावे म्हणजे राहिलेल्या आयुष्याची सरासरी निघेल. निरनिराळें वय प्राप्त झाल्यावर बाकी किती आयुष्य राहण्याचा संभव आहे त्याबद्दल पुरुष व स्त्रियांवार कोष्टक खाली दिलें आहे. इंग्लंड बेल्जियम वय पुरुष स्त्री पुरुष स्त्री स्वीडन पुरुष स्त्री जन्म ४४ ४६ ४० ४३ ४८ ५५ ५ वर्षे ५४ ५६ ५३ ५४ ५४ ५९ F १०, ५१ ५२ ४९ ५१ ५० ५५