Jump to content

पान:आरोग्यशास्त्र.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८६ आरोग्यशास्त्र अंतर पडतें म्हणून ह्या कामीं शुद्ध मृदु जल वापरावें. अल्प उष्णता- -मानांत जंतुनाशक द्रव्यें अधिक कार्य करतात. जंतुनाशक द्रव्यांचे पाण्यांतील मिश्रणापेक्षा तेलांतील दुग्धरूप मिश्रण अधिक सामर्थ्यवान् असतें. रोग्याची खोली, वहिवाटीच्या खोल्या, माणसें, वस्त्रे, मलमूत्रादि उत्सर्जित द्रव्यें, प्रेतें, स्नानगृहें इत्यादींचें जंतुनाशन करण्याचे काम व्यवहारांत पडतें. जंतुनाशनाच्या व्यवहारोपयोगी दोन रीती आहेत. १ ( द्रवरूप जंतुनाशक द्रव्यें) हजाऱ्याने शिंपडणें, (२) वायुरूप द्रव्ये वापरणे. (१) हजाऱ्याचे शिंपडणें जंतुनाश करणाऱ्या इन्स्पेक्टरने गाडीत पातीं, एक एकिफॅक्स् हजारा च जंतुघ्न द्रव्यें घालून दोन मदतगारांनिशीं जंतुनाशनासाठीं जायें. १. आगाऊ जंतुविरहित केलेल्या खोलीमध्ये बिछाना, कपडे, रुमाल इत्यादि पोत्यांत भरावे व बांधावे व ते वाफेनें विरहित करण्यासाठी जंतुनाशक ठाण्यावर पाठवून द्यावे. २. हजाऱ्यांत जंतुघ्न द्रावण भरून त्यानें भिंती, जमिनी, छत, कोपरे इत्यादि धुवावे. सांधेकोपरे व जेथे जेथें केर बसण्याच्या जागा असतील त्या अधिक काळजीनें धुवाव्या. धुण्यापूर्वी भिंती खरडाव्या. भिंतीवर शिंपडतांना जंतुघ्न द्रव्य खालून वर शिंपडावें. ३. जंतुघ्न द्रावणांत फडकें बुचकळून त्यानें तसबिरा व आरसे पुसावे. ४. स्नानगृहे व शौचकूप ह्यांचें निर्जंतुकरण करावें. त्याचप्रमाणे रोग्याने वापरलेली भांडी व तस्त त्यांचेहि करावें. ५. मोऱ्या धुवून काढाव्या व नंतर शेकडा ५ भाग प्रमाणे कर्बालिक ऍसिडाचे द्रावण त्यांत शिपडावें.