पान:आरोग्यशास्त्र.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० आरोग्यशास्त्र हा प्रकार फार खर्चाचा असून हा वापरण्याची रीत फार अवघड आहे. शिवाय ओझोन वायूपासून पाण्याला जी घाण येते, ती नाहींशी करण्या- स्तव पाणी कांहीं दिवस न वापरतां तसेंच सांठवून ठेवावें लागतें. ह्या- साठीं ह्या वायूच्या उपयोगाचा प्रसार फार ठिकाणी होत नाहीं. ( ३ ) गर्द नारिंगी रंगाचे किरणः - ही रीत फार खर्चाची आहे. ह्यामध्ये वापरण्याच्या काचेच्या नळ्या फुटतात व अपारदर्शक होतात. म्हणून त्या पाळटाव्या लागतात. हे किरण बाष्पीभूत पारदाचे दहनापासून उत्पन्न होतात. पारदाची वाफ विद्युत्प्रवाहानें करावी लागते. हिचे - पासून उत्पन्न झालेल्या गर्द नारिंगी रंगाचें शोषण काचनलिका करतात. म्हणून ह्या किरणांचा प्रकाश जलावर पडून त्याचें निर्जंतुकरण व्हावें म्हणून पारदबाष्पाचा दीप पारदर्शक अशा कॉज नामक खडकापासून केलेल्या नालकत असावा लागतो. ह्या किरणांचा प्रसार गढूळ पाण्यावर होत नाहीं, म्हणून निर्मल करून पाणी घ्यावें लागतें. तसेंच त्या पाण्याची खोली अल्प असली पाहिजे. वरील किरणांचा प्रभाव इतका जलद व पूर्णपणें होतो की बॅसिलस कोलै १५-२० सेकंडांत नाश पावतात; बॅसिलस टैफोसस १० ते २० सेकंडांत नाहीसे होतात; कॉलरा व्हिब्रिओ १० ते १५ सेकंडांत मरून जातात. स्नानगृदें, अवगाहस्थाने ( स्विमिंग बाधस् ) अवगाहस्थानांमध्य, अफाट हौदांत सोडून दिलेल्या पाण्यांत त्वचा, श्वास, नासिक, मुख, गुद व मूत्रद्वार ह्यांतून येणाऱ्या जंतूमुळे व प्राणिज पदार्थांमुळें तें जल बिघडतें. अशासाठीं जुनें उदक सोडून देऊन तो हौद नीट धुऊन त्यांत पाणी भरीत जावें. परंतु हें काम खर्चाचें आहे. म्हणून क्लोरिनयुक्त कृमिघ्न द्रव्यें पाण्यांत टाकावीं. ह्यामुळें जल गोड, दुर्गंधरहित रहातें व हौदाचे तळीं व बाजूंना बुळबुळीत गाळ बसत नाहीं.