पान:आरोग्यशास्त्र.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जंतुविकाराचीं मूलतत्त्वें ૨૨ दाब असलेली वाफ वापरतात, त्यामध्ये ती मधून मधून बाहेर सोडावी. असें केल्याने जाड पदार्थांचे मध्यभागाची हवा बाहेर पडण्यास अंव- सर सांपडतो. जी वाफ करतात ती आर्द्र व अति उष्ण अशा दोन प्रकारची असते. (फॉर्मर) पहिलीचें कार्य वेगानें व तिचा प्रवेश पूर्णपर्णे होतो म्हणून ती अधिक चांगली असते. दाब वाढविल्याने १००° से. पेक्षां अधिक उष्णमानाची वाफ तयार करतां येते व ती आर्द्र जातीची असते. परंतु दाब वाढविल्याशिवाय फक्त तिची उष्णता वाढविली तर ती अति उष्ण ( सुपरहीटेड ) होते. अशा वाफेचे कार्य उष्ण कढत हवेसारखें होतें, म्हणून आई वाफ चांगली आहे. ज्या जंतूंचा नाश करावयाचा असेल त्यांचा स्वभाव, पदार्थाचा जाडीपणा व जी वाफ वापरली जाते तिच्या दाबावर निर्जंतुकरणास गणारा वेळ ह्यांवर अवलंबून असतो. ११५° ते १२०° सें. उष्णमान वीस मिनिटें लावलें तर विविध स्थितींत सर्व प्रकारच्या जंतूंचा नाश पूर्णपणे होतो असे विविध व बारकाईनें केलेल्या उत्तम शोधाअंती सिद्ध झालें आहे. असे करतांना पदार्थ फार ओले झाले तर रंग बिघडतात व मिसळतात म्हणून ते बाहेर काढतांना साधरण कोरडे असावे अशी व्यवस्था पाहिजे. वरील सूचना लक्षांत ठेवल्यानें एकाद्या जंतुनाशक यंत्राचे डिस- इन्फेक्टरचे उपयुक्ततेबद्दल सहज मत देतां येईल. वॉशिंग्टन लायन्स पेटंटप्रमाणे केलेले स्टोव्ह इंग्लंडांत फार करून वापरतात. नॉटिंगहॅम स्टोव्ह, दि इक्विपेक्स डिसइन्फेक्टर, रेक्स स्टोव्ह, शचे स्टोव्ह हे प्रचारांत आहेत. वाफेचे डिसइन्फेक्टर जंगम प्रकारचे करतात. म्हणून ते अन्य