पान:आरोग्यशास्त्र.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(ब.) स्वाभाविक जंतुविकाराची मूलतत्वे ૨૬ (१) कायमची. जसें :-देवी, गोवर डांग्या खोकला. रोग झाल्यानें प्राप्त २ (२) बराच काळ टिकणारी. (३) अल्पकालिक. जसें- (आ) स्पोसीफिक झालेली. प्रयत्नाने प्राप्त झालेली. स्वाभाविक निर्भयताः - सिद्दी लोकांना इन्फ्ल्यूएंझा . {Passive or antitoxico Active or Isopathic पीतज्वर ( यलो फीवर ) होत नाहीं असें म्हणतात. प्रत्येक मनुष्याच्या आंगीं सर्व प्रकारच्या जंतूं- संबंधी प्रतिरोधक शक्ति असते. पण भिन्न लोकांमध्ये ही शक्ति भित्र प्रमाणांत असते. Active or Isopathic निर्भयता :- ही औषधी द्रव्यांचा अंत:- क्षेप ( इनॉक्युलेशन) केल्यानें प्राप्त होते. हा अंतःक्षेप पांच प्रकारचा असतो. ( १ ) सजीव विषारी जंतूंचा, (२) जिवंत पण सौम्य केलेल्या जंतूंचा, ( ३ ) निर्जीव विषाचा ( ४ ) बॅक्टेरियापासून तयार केलेल्या द्रवाचा, (५) जंतूंपासून उत्पन्न झालेले विष मंद करून त्यांचा अंत:- क्षेप करतात. हे अंतःक्षेप योग्य मुदतीनंतर व वाढत्या प्रमाणांत केल्यानें ज्या जंतूंचा अंतःक्षेप केला त्यांसंबंधी बहुतेक पूर्ण निर्भयता शेवटी प्राप्त होते. ही निर्भयता प्राप्त होण्यास फार काल लागतो. म्हणून हा प्रति- बंधक उपाय आहे हे उघड आहे. आजार सुरू होण्यापूर्वी निर्भयता उत्पन्न झाली पाहिजे. म्हणून रोग झाल्यास त्याला बरा करणारा हा उपाय नव्हे. परंतु एकदा निर्भयता प्राप्त झाल्यावर ती फार काळ टिकते. देवीच्या प्रतिबंधक उपायास व्हॅक्सिनेशन हा शब्द योजतात. परंतु अलीकडे सर्व प्रकारच्या प्रतिबंधक अंतःक्षेपास व्हॅक्सिनेशन हा शब्द