पान:आरोग्यशास्त्र.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जंतुविचाराचीं मूलतत्त्वे २६१ घटसर्प (डिप्थेरिआ ) संबंधी शोध करतांना मांजरें, कोंबड्या आणि पारवे ह्यांच्याबद्दल चौकशी करावी. ( ३ ) कारटैनः -- जर रोग्याला हॉस्पिटलमध्यें नेलें व घराचें निर्जंतुकरण पुरतेपणीं केलें तर त्या घरांतील माणसांना कॉरंटैनमध्ये ठेवण्याची जरुरी नाहीं. जर रोग्यांची चिकित्सा घरांतच केली तर त्या कुटुंबांतील शेवटल्या रोग्यापासून स्पर्शसंचार होण्याचा काळ संपेपर्यंत व त्या घराचे निर्जंतुकरण होईपावेतो त्या कुंटुंबाला फॉरटैनमध्ये ठेवलें पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीनें पाहतां स्पर्शसंचारी रोग्यापाशीं जाणाऱ्या लोकांनी समाजांत फारसें मिसळू नये. कॉरंटन दोन प्रकारचें असतें, (१) आंतील व (२) बाहेरील. सुरक्षिततेसाठीं न बिघडलेल्या गांवाला दूषित स्थळीं जाऊं देत नाहीत. ह्यास आंतील कॉरंटेन म्हणतात. दुसऱ्या प्रकारांत दूषित गांवाला किंवा खेड्याला भोवतालील प्रांताच्या बचावासाठी कॉरंटेन सुरू करतात. (१) आंतरराष्ट्रीय ( इंटर्नेशनल ); (२) शाळेसंबंधी; (३) गृहसंबंधी कॉरंटेन असेंहि त्याचें वर्णन करतात. पहिल्या वर्गाच्या फॉरंटेनमध्ये प्रसिद्ध केलेल्या दूषित जागेपासून येणाऱ्या लोकांना अथवा ज्या आजारासंबंधीं कॉरंटेन पुकारले असेल अशा रोग्यापासून आलेल्या लोकांना बंदरावर सक्तीनें कॉरंटैनमध्ये ठेवतात. (२) शाळेसंबंधी कॉरंटेन: - जे विद्यार्थी दूषित घरांतून येतात अथवा ज्यांना स्पर्शसंचारी विकार झाला आहे, अशा विद्याथ्र्यांना शाळेत येण्याची मनाई करावी. स्पर्शसंचारी रोगामुळे बहुतेक विद्यार्थी गैरहजर रहात असल्यास शाळा बंद करावी.