Jump to content

पान:आरोग्यशास्त्र.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शाळाविषयक आरोग्य ( स्कूल हायजिन ) २२३ कायमच्या आतुरालयांत पाहिजे. हंगामी आतुरालयें तथ्याचीं करावीं व चर पत्रा घालावा. जमिनीला जोतें सुमारें एक हात उंच असावे. प्लेगा- सारख्या सांधींहि आयत्या वेळीं हीं उभारावी लागतात. ज्वराच्या आतुरालयांत कांहीं सामान्य प्रकारचे नियम पाळावे लागतात. तेथें काम करणारांनी आपलें बाहेरलें वस्त्र पालटल्याशिवाय आतुरा- लयाच्या बाहेर जातां उपयोगी नाहीं. त्याच्या खुल्या आवारात देखील फळें इत्यादि विकणारांना येऊं देतां कामा नये. अत्यंत जवळचे नातेवाईक व जिवलग मित्र यांशिवाय इतरांना आंत येऊं देऊं नये. त्यांना दिवसांतून एकदां घटकाभर आंत सोडावे. गांठ घेणारांनी कफनी घालावी व बाहेर पडतांना हातपाय व तोंड धुवावे. आतुरालयाच्या बाहेर पडतांक्षणी भाडयाच्या गाडीत बसूं नये. रोग्यासाठी दालने, औषधे वगैरे सामुग्री ठेवण्यासाठी कोठी, अधिकारी व नोकरासाठीं राहण्याची जागा आणि कपडे व अंग धुणे, निर्जंतुकरण, प्रेत ठेवणे इत्यादि साठीं बाह्य गृहें पाहिजेत. प्रकरण १० वें शाळाविषयक आरोग्य ( स्कूल हायजिन ) शाळेची जागा मध्यवर्ती असावी. गोंगाटाच्या जवळची जागा त्याज्य समजावी. शांत स्थळ न मिळाल्यास रस्त्यापासून ती निदान ६० फूट दूर असावी. शाळेची इमारत बांधतांना वर्गाच्या खोल्या बांधण्याकडे मुख्य लक्ष द्यावें. त्या पृथक असाव्या. शाळेची इमारत दोन मजल्यापेक्षां जास्त नसावी. शाळेचा मुख्य दिवाणखाना निदान १५ फूट रुंद असावा व स्यांत उजेड भरपूर असावा. मुख्य दिवाणखान्याच्या भोंवतीं वर्गाच्या