पान:आरोग्यशास्त्र.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १९३ किंवा बराकीत अगर छावणीत गर्दी, अपुरें, भरड व निकस अन्न- हिंदुस्थानांत हा आजार नित्याचा आहे. डिसेंटरचे एका प्रकारास ऍमीबिक डिसेंटरी म्हणतात. कारण या विकाराचे मळांत [Amoeae coli ] ऍमीबा कोली नामक (Proto- zon) प्रोटोझोन सांपडतो. डिसेंटरी रोग पाण्याचे द्वारां पसरतो. धूळ, केर व माशा ह्यांनीं हा आजार फैलावतो. बोअर युद्धांत डिसेंटरच्या कारणावर बराच प्रकाश पडला. सर्दी, गारठा, वाईट व क्षोभक अन्न, मानसिक औदासिन्य इत्यादि प्रावण्य कारणें आहेत. ग्रंथिक सन्निपात ( प्लेग ) ब्युबॉनिक प्लेगचा उल्लेख २००० वर्षांपूर्वीच्या प्राचीन लेखकांनी केलेला आहे. तो लिबिया, इजिप्त व आफ्रिकेचे उत्तर भागाचे इतर देश ह्यांत होता. युरोपखंडांत चवदाव्या शतकांत " ब्लॅक डेथ " नांवानें तो प्रसिद्ध होता. त्याचेपासून भयंकर प्राणहानि झाली. लंडन शहरांत १६६४ साली प्लेगाची मोठी साथ आली. तेव्हां त्या शहरीं त्रेसष्ट हजार लोक मृत्युमुखी पडले. चीन व पश्चिम हिंदुस्थानांत हा आजार फार होत असे. चीन देशांत तो अलीकडे नाहीं. इक्वेटरजवळ तो विरळा असतो. तो ऊष्ण व थंड हवेंत, सर्द व सुक्या ऋतूंत, व शुष्क व दमट जागेत व सर्व आल्टिट्यूडमध्यें होतो. हिंदुस्थानांत अत्यंत उष्ण हवेंत प्लेग कमी होतो व थंड हवा सुरूं झाली म्हणजे तो जागृत होतो. हा आजार जंतुजन्य आहे. १८९४ मध्ये किटस्टो व यर्सिन ह्यांनीं हॉंगकांग येथे ह्याचे बॅसिलि शोधून अलग काढिले. मृत्यूनंतर हे रक्त, पांथरी, इतर इंद्रिये व न फोडलेल्या गांठी ह्यांमध्यें सांपडतात. पिचकारी वगैरे शरिरांत सोडणे, हुंगणें व गिळणें झांनी ह्या रोगाचा स्पर्शसंचार १३